हिमाचल प्रदेश | हिमाचल प्रदेश मध्ये एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. या ठिकाणी झालेल्या लँडस्लाईडच्या घटनेमुळे प्रवाशांनी भरलेली बस ढिगाऱ्याखाली अडकली आहे. बसवरच कड्याचा काही भाग कोसळला. तसंच काही कारही या ढिगाऱ्याखाली गेल्या आहेत. या घटनेमुळे तीसपेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या घटनेत आत्तापर्यंत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती हिमाचल सरकारने दिली आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. उर्वरित 25 ते 30 लोकांचा शोध सुरू आहे. किनौर या ठिकाणी डोंगरकडा कोसळून ही घटना घडली आहे. प्रशासन, लष्कर आणि NDRF यांच्यातर्फे बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.
काय घडलं नेमकं?
बस किन्नौरहून शिमला या ठिकाणी जात होती. त्यावेळी काही दगड कोसळू लागले. त्यानंतर दरड कोसळली आणि ही बसच ढिगाऱ्याखाली गेली. एवढंच नाही तर काही दगड कोसळत असल्याने बचावकार्यात अजूनही अडचणी येत आहेत. घटनास्थळावरून जे फोटो समोर येत आहेत, ते देखील थरकाप उडवणारे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आधी थोड्या प्रमाणात दरड कोसळली आणि त्यानंतर हे प्रमाण वाढलं त्यामुळे एक बस आणि काही कार या ढिगाऱ्याखाली अडकल्या आहेत.
Himachal Pradesh: ITBP personnel of 17th battalion, 19th battalion & 43rd battalion reach the landslide site on Reckong Peo-Shimla Highway near Nugulsari in Kinnaur
"4 vehicles including a bus and a truck reported trapped in the rubble. Casualties feared," ITBP says pic.twitter.com/ra8FitboYf
— ANI (@ANI) August 11, 2021
बचावकार्य सुरु
घटनास्थळी बचाव कार्य सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या दुर्घटनेबाबत हिमाचलचे मुख्य्मंत्री जयराम ठाकूर यांच्याशी चर्चा केली आहे. तसंच ITBP चे डीजी यांच्याशी चर्चा करून तातडीने मदत करण्याचे निर्देशही दिले आहेत. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ठिकाणी दुर्घटना घडली तिथे बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. पोलीस, स्थानिक प्रशासन हे तातडीने मदतीसाठी पोहचले आहेत असंही ठाकूर यांनी सांगितलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.