हिमाचल प्रदेश । हिमाचल प्रदेश मध्ये एक दुःखद दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून ९ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. सांगला खोऱ्यात ही दरड कोसळली आहे. दरड कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून डोंगवरावरुन दगडं वेगाने खाली खोऱ्यात कोसळत असल्याचं दिसत आहे. दरड नदीवर असणाऱ्या पुलावर कोसळल्यानंतर पुल नदीत कोसळतानाही व्हिडीओत दिसत आहे.
#WATCH | Himachal Pradesh: Boulders roll downhill due to landslide in Kinnaur district resulting in bridge collapse; vehicles damaged pic.twitter.com/AfBvRgSxn0
— ANI (@ANI) July 25, 2021
मृत व्यक्तींवर दगड कोसळली
हिमाचल प्रदेश मध्ये दुर्घटनेत पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. किन्नोरच्या बटसेरीत ही दुर्घटना घडली आहे. मृत झालेले सर्व ११ जण पर्यटक असून त्यांच्या वाहनांवर दगडं कोसळली अशी माहिती किन्नोरचे पोलीस अधिक्षक सॅजू राम राणा यांनी दिली आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रशासनसोबत चर्चा
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करत घटनेसंबंधी चौकशी केली आहे. प्रशासनाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून मदत पुरवली जात आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी आपण प्रार्थना करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.