HW News Marathi
महाराष्ट्र

महाडमध्ये दरड कोसळून ३० हून अधिक घरं ढिगाऱ्याखाली, नागरिक अजूनही बेपत्ता

महाड | कोकणात सतत ३ दिवस जोरदार पाऊस पडत आहे. महाड मध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. महाडमधील तळई गावातील तब्बल ३० हून अधिक घरांवर दरड कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या दुर्घटनेत येथील तब्बल ७० ते ७५ नागरिक बेपत्ता असल्याची माहिती मिळते. दरम्यान, काही वर्षांपूर्वीच अशीच घटना पुणे जिल्ह्यातील माळीण गावात घडली होती. ज्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

गावांशी संपर्क तुटला

महाडमध्ये दरड कोसळून अनेक घरं त्या खाली चिरडली गेली आहेत. अश्यातच गावांशी संपर्क तुटला आहे. महाड आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्याने बिरवाडी आणि दुर्घटनाग्रस्त भागाशी संपूर्णपणे संपर्क तुटला आहे. ही दुर्घटना होऊन आता अनेक तास उलटले आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे अद्यापही दुर्घटनास्थळी बचाव कार्य करणाऱ्या टीम पोहचू शकलेल्या नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार NDRF च्या काही तुकड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत नेमके किती जण अडकले आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, या ठिकाणचे तब्बल ७२ हून अधिक जण बेपत्ता असल्याचं बोललं जात असल्याने चिंता वाढली आहे.

रायगड मध्ये चिंताजनक परिस्थिती

कोकणात गेल्या ३ दिवसांपवून मुसळधार पाऊस पडत आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून गावात पूरपरिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यात देखील पावसाच्या मुसळधार सरी सतत बरसत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी जे बचाव कार्य सुरु आहेत तिथे अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रायगड जिल्ह्यातील अनेक महाड तालुक्यातील अनेक नद्यांना देखील पूर आला आहे. त्यामुळे शहरातील अनेक नागरी वस्त्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. तर दुसरीकडे अद्यापही पावसाने उसंत घेतलेली नाही. त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन राहावं लागत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मायमराठीतील साहित्यकृतींना राष्ट्रीय सन्मान मिळणे अभिमानास्पद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Aprna

निजामुद्दीन येथे झालेला प्रकार महाराष्ट्रात होऊ देणार नाही

News Desk

परराज्यातून धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – अजित पवार

News Desk