HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झोपुच्या ‘आसरा अ‍ॅप‘चा शुभारंभ

मुंबई | झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘आसरा’ मोबाईल अ‍ॅप्लीकेशनचा शुभारंभ कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात पार पडला. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘आसरा’ या मोबाईल अ‍ॅप्लीकेशनचा उपयोग झोपडपट्टीधारकांना होऊन या प्राधिकरणाच्या संपूर्ण कामकाजात पारदर्शकता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात सांगितले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘आसरा’ मोबाईल अ‍ॅप्लीकेशनचा शुभारंभ करताना बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर उपस्थित होते.

झोपूने डिजिटलायझेशनची चांगली सुरुवात केली आहे. झोपडपट्टीवासियांना विविध सोयी सुविधा, योजना यांची माहिती होण्याच्या दृष्टीने या ‘आसरा अ‍ॅप‘चा उपयोग नक्कीच होईल. या विभागाने त्यांच्या संपूर्ण कामकाज आणि व्यवहाराचे डिजिटलायझेशन करावे. प्रारंभी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी या ‘आसरा अ‍ॅप’चे सादरीकरण करुन माहिती दिली.

‘आसरा’ हे अ‍ॅप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची सविस्तर माहिती त्यात असणार आहे. जीपीएसच्या मदतीने ‘आसरा’ अ‍ॅपद्वारे वैयक्तीक झोपडीची माहिती, प्रस्तावित योजना व झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषीत असलेल्या योजनांची माहिती या अ‍ॅपद्वारे मिळू शकते. तसेच सामान्य झोपडीधारक हे आपली झोपडी व झोपडपट्टीसंबंधित झोपडी क्रमांक, गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा, स्लम क्लस्टर 2016 ची माहिती घेऊ शकतात.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कामकाजात जास्तीत जास्त पारदर्शकता, कार्यक्षमता आणि परिणामकारकता आणण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे.यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कदमांनी केलेल्या आरोपानंतर परब अन् सामंतांनी दिल्या प्रतिक्रिया

Aprna

#coronavirus : राज्यात पाच जणांचा मृत्यू, दिवसभरातला ‘कोरोना’चा दुसरा बळी

swarit

केसरकरांचा राणेंना इशारा,”…तर आम्ही मागे-पुढं पाहणार नाही”

News Desk