HW News Marathi
महाराष्ट्र

“पोलिस म्हणजे मानलं तर देव नाहीतर दगड”, उदयनराजेंचं धक्कादायक विधान

सातारा | राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सरकारने काही कडक निर्बंध लावले आहेत. मात्र, भाजपने वारंवार सरकारच्या लॉकडाऊनच्या भूमिनेकवर विरोध दर्शवला होता. आता यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे. राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास लोकं आणि मी ऐकणार नाही. उद्यापासून लॉकडाऊन उठला पाहिजे. त्यानंतरही शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास तो आम्हाला मान्य नाही. यावरून मारामारी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण त्यासाठी सरकार जबाबदार असेल. लोकं पोलिसांना चोपून काढतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (१० एप्रिल) साताऱ्यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊनविरोधात आंदोलन केले. हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर बसले होते. या प्रतिकात्मक आंदोलनानंतर उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. उद्यापासून लॉकडाऊन उठला पाहिजे. लोकांची आर्थिक अवस्था सरकारने लक्षात घेतली पाहिजे. लॉकडाऊन झाल्यास लोकांची उपासमार होईल.

सरकारमधील कोणते तज्ज्ञ लॉकडाऊनचा निर्णय घेतात, असा सवालही त्यांनी विचारला. ते कुठल्याही दृष्टीकोनातून तज्ज्ञ वाटत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत वैद्यकीय समुदाय किंवा शास्त्रज्ञ लॉकडाऊनची गरज आहेच, असा अहवाल देत नाहीत, तोपर्यंत आम्ही लॉकडाऊन लागू देणार नाही, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.

यावेळी उदयनराजे भोसले यांनी पोलिसांना खुप सुनावले आहे. पोलिसांचा आदर करतो पण त्यांना हवं ते करण्य़ाचा अधिकार, लोकांना मारण्याचा अधिकार कोणी दिला असंही त्यांनी म्हटलं आहे. इतकचं नाही तर पोलिस म्हणजे मानलं तर देव नाहीतर दगड अशा भाषेत त्यांनी पोलिसांबद्दल वक्तव्य केले आहे.

‘प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर आज लसींचा तुटवडा जाणवला नसता’

“देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता’, असे उदयनराजे भोसले म्हणाले. “लोकसंख्या पाहूनच कोरोना लसींचे वाटप झाले पाहिजे. त्यावरून उगाच वाद निर्माण करण्यात अर्थ नाही”, असे मत उदयनराजेंनी व्यक्त केले. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्य सरकारने लागू केलेला कडक निर्बंधांवर बोलताना उदयनराजे म्हणाले की, “मी व्यापारी असतो तर जग इकडे तिकडे झाले असते तरी मी दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही.” त्याचप्रमाणे, “व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे? सणासुदीचे दिवस आहेत. व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे .उद्या बँका हप्ते भरण्यासाठी मागे लागतील. त्यामुळे दुकानातील कामगारांना लस द्या”, अशीही मागणी उदयनराजेंनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समिती स्थापन झाल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, आजही राज्यात एसटी सेवा बंद

News Desk

भाजपचे काँग्रेसीकरण सुरु झाले आहे !

News Desk

देवेंद्र फडणवीस जाणार शरद पवारांच्या भेटीला…नेमकं कारण काय ?

News Desk