HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्या रॅलीमध्ये जमलेली गर्दी ही भाड्याने आणलेली नाही !

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला ओळखलेल्या जाणाऱ्या बारामती विधानसभा मतदारसंघातून महाआघाडीतर्फे अजित पवार यांनी आज (४ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. “उमेदवारी अर्ज दाखल करताना माझ्या रॅलीत जमलेली गर्दी ही भाड्यानी आणला नसून हा सर्व जनसमुदाय माझ्या प्रेमा खातर आला आहे,” असा हास्यात्मक टोला अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, “मी बारामतीकरांचा हा उत्साह पाहता कमीत-कमी एक लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल,” असा विश्वास त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलातना व्यक्त केला आहे.

मी उमदेवारी अर्ज दाखल करताना येताना मला वाटले नव्हते, बारातमीततील तरुण-तरुणी माझ्या ऐवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थितीत राहतील. तरुणी पिढीने माझ्या रॅलीमध्ये होणे हे माझ्या विजयाचे लक्ष असून हा जनसमुदाय भाड्यांनी आणलेला नसून माझ्यावरील प्रेमापोटील आल्याचे अजित पवारांनी स्पष्ट सांगितले. तत्पुर्वी पवार यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पवार यांच्या स्वागतासाठी समर्थक नगरसेवक सत्यव्रत काळे यांनी चक्क ५०० किलोचा पुष्पहार तयार केला.

अजित पवारांनी बारामतीच्या त्यांनी कसब्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून मिरवणुकीची सुरुवात झाली. तिथून गुणवडी चौक, इंदापूर चौक मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बारामती येथील प्रशासकीय भवन येथे अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा पार्थ आणि जय यांनीही सहभाग घेतला होता.

एक लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल

पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना या मतदारसंघातून सव्वा लाखांच्या वर मताधिक्य मिळाले. आजच्या माझ्या रॅलीला मिळालेल्या प्रतिसादाला बघता मला यश नक्कीच मिळणार आहे. मतदार संघातील जनता स्वतः या रॅलीत सहभागी झाले होते. त्यामुळे बारामतीकरांचा हा उत्साह पाहता कमीत-कमी एक लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल. असा दावा अजित पवार यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहीत टिळक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा

News Desk

कोरोनाच्या उपाययोजनांना टाटा समूहाचा ५०० कोटींचा निधी जाहीर

swarit

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार प्रकरणी तिघांना २० वर्ष सक्त मजूरीची शिक्षा

News Desk