HW News Marathi
Covid-19

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद

मुंबई | विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज (२६ मे) सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. ठाकरे सरकार राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरल्याचा आरोप भाजपने केला होता. या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्र बचाओ आंदोनल केले होते. यावेळी फडणवीस यांनी केंद्रप्रमाणे राज्य सरकारने देखील पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली होती. या पार्श्वभूमीवर सामनाच्या आजच्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे.

कोरोना उपाययोजनांसंदर्भात गुजरात सरकारला अहमदाबाद उच्च न्यायालयाने फै लावर घेतले आहे. तेथील सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षा भयंकर असल्याचे फटकारे उच्च न्यायालयानेच मारले आहेत. याउलट महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील सरकारने जी रुग्णालये गेल्या दोन महिन्यांत उभी केली आहेत त्या रुग्णालयांत विरोधी पक्षनेत्यांनी पायधूळ झाडावी व एकदा तीर्थक्षेत्र गुजरातचा दौरा करून यावे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या तयारीची कल्पना येऊ शकेल. पॅकेजची रिकामी खोकी व विरोधकांची रिकामी डोकी महाराष्ट्रातील कोरोना युद्धात अडथळे आणीत आहेत. या रिकाम्या खोक्यांत रिकामी डोकी भरून त्यांना गुजरातच्या अंधारकोठड्या पाहायला पाठवायला हवे, असे अग्रलेखता म्हणाले.

दरम्यान, शिवसनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी दोन ट्वीट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. “मा. शरद पवार व मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दिड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी. जय महाराष्ट्र !!” असे राऊत यांनी पहिले ट्वीट केले आहे. तर “करोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है,” असे राऊत दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले.

संबंधित बातम्या

विरोधी पक्षनेत्यांनी एकदा तीर्थक्षेत्र गुजरातचा दौरा करून यावे, महाराष्ट्राच्या तयारीची कल्पना येईल | सामना

महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील !

महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे का ? संजय राऊत म्हणतात

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना कोरोनाची लागण

Aprna

भारतात शिरला नवा कोरोना, ब्रिटनमधून परतलेले ६जण कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

आज ७७८ नवीन रुग्णांचे निदान, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ६४२७ । राजेश टोपे

News Desk