HW News Marathi
महाराष्ट्र

#MaharashtraResult2019 : जाणून घ्या…कशी होते मतमोजणी

मुंबई | राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघ आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (२४ ऑक्टोबर) मतमोजणीसाठी जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणीसाठी दहा हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मात्र, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल उशीरा लागणार आहे.

मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून निवडणूक आयोगाचे निरीक्षक उपस्थित राहणार आहेत. फेरी निहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करणार असून सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती केंद्राबाहेर लावण्यात आलेल्या स्पिकरद्वारे मिळणार आहे. मतमोजणी केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मतमोजणीच्या स्ट्रॉंगरुमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. तसेच स्ट्रॉंग रुम मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आला आहेत. स्ट्रॉंग रुममधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी आणि नंतर पेट्या स्ट्रॉंग रुममध्ये जमा करणे या सर्व बाबींचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे

अशी होती मतमोजणी

मतमोजणीसाठी २६९ ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात १४ ते २० टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक आणि दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी असतात. मतदार संघातील ५ बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून निवडले जातात. व्हीव्हीपॅट मधील चिट्ठीतील मते आणि आणि ईव्हीएम वरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. प्रारंभी इटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) बारकोडद्वारे मोजली जाईल. टपाली मतेही सुरुवातीला मोजली जातील. भारत निवडणूक आयोगाच्या eciresults.nic.in या संकेतस्थळावर मतदारसंघाचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीदेखील उपलब्ध होणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रुक! अभी तय नही है, किसके घर जाना है…संजय राऊतांचे वादग्रस्त ट्विट

News Desk

राज्य आणि केंद्र सरकारचा एफआरपीचे तुकडे पाडण्याचा घाट ?

News Desk

‘मोदी एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा! गणपतीची आरती म्हणत चाकरमानी मुंबईहून कोकणात रवाना!

News Desk