HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात कर्जबाजारी दाम्पत्याची आत्महत्या

पुणे | पुण्यातील शिवणे येथील निलेश चौधरी या व्यावसायिकाने कर्जाला कंटाळून दोन मुली आणि पत्नीला विष पाजून आत्महत्या केली.. नैराश्यातून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट निलेश चौधरींच्या खिशात मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. निलेश चौधरी यांचा प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय होता. ते शिवणे या ठिकाणी राहात होते.

मात्र कर्जाचा डोंगर सहन न झाल्याने त्यांनी आपल्या कुटुंबासह स्वतःचे आयुष्यही संपवले. पोलिसांना आज सकाळच्या सुमारास ही माहिती मिळाली. निलेश चौधरी ३९ वर्षांचे होते. त्यांनी त्यांची पत्नी नीलम, मुलगी श्रिया आणि दुसरी मुलगी श्रावणी या तिघींना विष दिले. त्यानंतर पंख्याला दोरीने गळफास घेऊन स्वतःचेही आयुष्य संपवले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर डेटाबॉम्ब, पोलीस बदलीच्या रॅकेटचा मांडला तपशील डेटा!

News Desk

आदित्य ठाकरेंना हजार रुपये पाठवा | धनंजय मुंडे

swarit

एनडीए’चा शेवटचा ‘खांब’ही कलथून गेला !

News Desk