HW News Marathi
महाराष्ट्र

“…की अशोक चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री बनतील”; काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

नांदेड | “मराठवाड्यात आज अशोक चव्हाणांच्या तोडीचा नेताच नाही. त्यामुळे, आता अशोक चव्हाण यांचे हात एवढे मजबूत करु की चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री बनतील”, असं मोठं वक्तव्य नुकतेच भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी केल आहे. खतगावकर यांनी शनिवारी (२३ ऑक्टोबर) नांदेडमधील रामतीर्थ येथे आयोजित एका प्रचारसभेत बोलत होते. दरम्यान, भास्करराव पाटील खतगावकर यांनी गेल्या रविवारी (१७ ऑक्टोबर) भाजपमधून राजीनामा देऊन आपण लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती.

काँग्रेसमध्ये केलेल्या घरवापसीबाबत प्रश्न विचारला असताना आपण काय उत्तर दिलं? याचाही किस्सा यावेळी खतगावकर यांनी सांगितला. “मला विचारलं गेलं तुम्ही काँग्रेसमध्ये पुन्हा आलात. कसं वाटतंय? त्यावर मी म्हणालो आपण १५ दिवस हिल्सस्टेशनला गेलो तरी घराची आठवण येते. तसाच जाऊन आलो. घरातल्यांना चांगलं वाटलं आणि मलाही”, अशी मिश्किल टिपण्णी यावेळी त्यांनी केली आहे. “मला अशोक चव्हाणांनी इतकं दिलंय की मी भाजपमध्ये जाताना आणि काँग्रेसमध्ये पुन्हा येताना काहीही मागितलं नाही”, असं देखील यावेळी खतगावकर म्हणाले.

“कोण जुना? कोण नवीन? मी पाहणार नाही”

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण देखील यावेळी उपस्थित होते. “माझ्यावर कुटुंब प्रमुखाची जबाबदारी दिली आहे. सर्वांचा मान सन्मान राखणार आहे. कोण जुना कोण नवीन हे मी पाहणार नाही”, असं वक्तव्य यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

देगलूर बिलोली पोटनिवडणुकीपूर्वी भाजपला दणका

भास्करराव पाटील खतगावकर यांच्या या निर्णयाने देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी भाजपतील दुफळी उघड झाली आहे. देगलूर बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक महत्त्वाची समजली जात आहे. विद्यमान दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर येत्या ३० ऑक्टोबरला मतदान घेण्यात येणार आहे. पुनर्रचनेनंतर २००९ साली अस्तित्वात आलेला देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी म्हणून राखीव झाला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ‘आघाडी’!

News Desk

पडद्याआडून माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रविण दरेकरांचा आरोप

News Desk

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून मुलीच्या वडिलांची हत्या

Aprna