मुंबई | ‘कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाचा परीक्षा घेऊ नये’, अशी विनंती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. ‘परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे या प्रकरणात पंतप्रधानांनी स्वत: हस्तक्षेप करावा’, असे आदित्य ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.कोरोनाच्या संकटकाळात विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही, याबाबत सुप्रीम कोर्टात आज (२४ ऑगस्ट) सुनावणी होणार आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षांविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर या आधी १८ ऑगस्टला सुनावणी झाली होती. या सुनावणीनंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आज सुप्रीम कोर्ट याबाबतचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. हा निकाल जाहीर होण्याआधी आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याती विनंती केली आहे
यूजीसीने देशभरातील विद्यापीठांना ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. देशात अनेक राज्यांत कोरोनाच्या संकटकाळात परीक्षा घेण्यास अनेक स्तरांतून विरोध केला जात आहे. ‘यूजीसी’ मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. ६४० पैकी ४५४ विद्यापीठांनी परीक्षा घेतल्याचे ‘यूजीसी’ने सांगितले आहे.
I have written to the Hon’ble Prime Minister, Shri @narendramodi ji on the health risk that the proposed exams of various streams, and entrance exams, would have for students and families across India and for his personal intervention. pic.twitter.com/nBAk0Ef7od
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 24, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.