HW News Marathi
महाराष्ट्र

दुधाचे दर वाढण्याची शक्यता

पुणे | दुधाच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे दुध उत्पादकांनी आंदोलन केल्यानंतर उत्पादकांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, ५० दिवस उलटूनही प्रत्यक्ष ती रक्कम न दिल्याने या अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा दूध उत्पादकांनी दिला आहे. त्यामुळे दुधाचे दर एका लिटरमागे पाच रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

अनुदान थकल्यामुळे उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची बैठक गुरुवारी झाली. त्यात ५८ सहकारी आणि खासगी डेअरीचे ७६ प्रतिनिधी उपस्थित होते. उत्पादकांना दर कमी मिळत असल्याने अनुदान देण्याचा निर्णय जुलैमध्ये राज्य सरकारने घेतला होता. आॅगस्ट महिन्याची रक्कम उत्पादकांना दिली. मात्र, त्यानंतर आतापर्यंतची रक्कम मिळालेली नाही. सरकारने १५ डिसेंबरपर्यंत अनुदान न दिल्यास त्या योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा दूध संघाच्या प्रतिनिधींनी दिला. त्यामुळे दुधाचे दर वाढविणार की नाही यावर बोलण्यास नकार दिला. मात्र मात्र अनुदान योजनेतून बाहेर पडल्यास दुधाचा दर वाढविण्याशिवाय व्यावसायिकांकडे पर्याय नसल्याचे सांगण्यात येते.

राज्यात गायीच्या दुधाचे दर १७ ते २० रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली आले होते. ग्राहकाला मात्र ते ४० ते ४२ रुपये प्रतिलिटरनेच दूध मिळत होते. त्यामुळे स्वाभिमानी संघटनेसह विविध शेतकरी संघटना व राजकीय पक्षांनी दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी १६ जुलैला दूधबंद आंदोलन केले होते. गाड्या अडवून दूध रस्त्यावर ओतणे, दुधाने जनावरांना आंघोळ घालणे, दुधाचे मोफत वाटप करणे, दुग्धाभिषेक करणे अशा विविध मार्गाने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने दुध उत्पादकांना योग्य ते भाव दिले जातील असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन १९ जुलैला आंदोलन करण्यात आले. त्यात अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार उत्पादकांना गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ आणि म्हशीला ३६ रुपये देण्याचे ठरले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेना भाजपात आता वाक युद्ध 

News Desk

नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेलच पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास!

News Desk

अखेर राज्यपालांकडून निमंत्रण! अजित पवार म्हणाले…..

News Desk
मुंबई

भर पावसात डबेवाल्यांची सेवा सुरु

News Desk

मुंबई | पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अगदी पावसाच्या सलामीलाच मुंबईत जागो जागी पाणी भरले आहे. शुक्रवारी पहाटेपासून मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत वर्षाचे 12 महिने मुंबईकरांना वेळेत डबा पोहचविणारे डबेवाले मात्र भर पावसात काम करताना पहायला मिळत आहे.

उन,वारा,पाऊस जरी असला तरी मुंबईचा डबेवाला मात्र आपली डबे पोहचविण्याची सेवा देण्यासाठी जीवाचा आटापिठा करत असतो. शनिवारी सकाळी भर पावसात भायखळा-राणीबाग या विभागात जेवणाचे डबे देण्याचे काम रोहीदास सावंत हे डबेवाले हसत हसत करत असल्याचे दिसून आले.

शनिवारी 1 नंतर मुंबईत पावसाने अधिकच जोर धरल्याचे दिसून आले. तरीही दुपार नंतरच्या जेवणानंतर रिकामे झालेले डबे तुंबलेल्या पाण्यातून मुंबईचे डबेवाले जमा करत असल्याचे दृश्य शनिवारी पहायला मिळाले. मुंबईतला कर्मचारी जर उन्हाळ पावसाळा काम करु शकतो तर मुंबईचा डबेवालाही त्यांना तितक्याच तत्परतेने जेवन वेळेत पोहचविण्याची मेहनत घेतो असे मत मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी व्यक्त केले.

Related posts

माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा घसरली

News Desk

अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचारप्रकरणी शिपाई अटकेत

News Desk

कंगना विरोधात दाखल करण्याचे आदेश, धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप

News Desk