मुंबई | राज्यात गेल्या आठ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. परंतु सरकार मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेत नसल्यामुळे संतप्त मराठा आंदोलकांनी आज जेल भरो आंदोलनाची हाक दिली आहे.
बेमुदत सुरु रहाणार मराठ्याचे ठिय्या आंदोलन
मुंबई |
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने गुरुवारी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.
मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.
मालेगाव, जालना, लातूरमध्ये जेलभरो आंदोलनाचे तीव्र पडसाद.
लातूर |
- संभाजी पाटील निलंगेकरांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन, आंदोलक झाले आक्रमक.
- पालकमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन.
- आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात.
नांदेडमध्ये मराठा आंदोलन पेटले.
जुन्नर नारायणगावमध्ये बंद.
नांदेड | मराठा आंदोलकांनी अर्धापूर तालुक्यात मेंढला गावाजवळ महामार्गावर टायर जाळले. दरम्यान एक ऑटोरिक्षादेखील पेटवल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
औरंगाबादमध्ये मुंडण आंदोलन करत मराठा आंदोलकांनी नोंदवला सरकारचा निषेध.
मराठा आंदोलकांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची घोषणा.
- आज प्रत्येक जिल्ह्यात जिल्हानिहाय जेलभरो आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
- मुंबईतही जेलभरो आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
- परळी येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी राज्यव्यापी खुली बैठक.
आझाद मैदानावर मराठा आंदोलनाला सुरुवात.
जेल भरो आंदोलनाला आझाद मैदानात सुरुवात,सरकार विरोधात घोषणाबाजी सुरु. | #HWnewsmarathi#MarathaReservationProtest #MarathaReservation pic.twitter.com/xUruYgKhaD
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) August 1, 2018
मुंबई |शांतते घोषणा देत आम्ही जेल भरो आंदोनल करणार आहे. महाराष्ट्र हे पहिले जेल भरो आंदोलन आम्ही करत आहोत | मराठा आंदोलक
जेल भरो आंदोलनासाठी आझाद मैदान सज्ज, सुरक्षेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त | #HWnewsmarathi #MarathaReservation pic.twitter.com/npdd0glwhw
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) August 1, 2018
मुंबई | मराठा आंदोलनातील समन्वयक केदार सुर्यवंशी आंदोलकांसोबत आझाद मैदानात दाखल.
(छाया : धनंजय दळवी)
मुंबई | आझाद मैदानात मराठा आदोलक दाखल.
(छाया : अपर्णा गोतपागर)
संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात.
नाशिक | मालेगावात जेलभरो आंदोलनाला सुरुवात
औरंगाबाद | जालना रोडवरील वरूडपाटी येथे मराठा आरक्षणासाठी रास्तारोको, काही आंदोलकांनी मुंडन करून केला सरकारचा निषेध.
#MarathaReservationProtest: Protesters block Pune-Solapur highway. pic.twitter.com/JjZgTKAlIX
— ANI (@ANI) August 1, 2018
मराठा आरक्षणासाठी आज मराठा आंदोलक जेल भरो आंदोलन करत आहे. त्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
(छायचित्र रिपोर्टर : अपर्णा गोतपागर)
आंदोन अधिक तीव्र झाल्यास मराठा आंदोलकांवर पाण्याची फवारणी करून रोखण्यासाठी पाण्याचे टॅंकर आझाद मैदानामध्ये ठेवण्यात आले आहेत.
(छाया : अपर्णा गोतपागर)
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.