HW News Marathi
Covid-19

कर्नाटकही लॉकडाऊन ! उद्यापासून १४ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

मुंबई । देशातील सातत्याने वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे. जवळपास सर्वच राज्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची झळ बसली आहे. त्यापैकी काही राज्यांनी कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला आहे. या राज्यांमध्ये आता कर्नाटक राज्याचाही समावेश होणार आहे. कारण, कर्नाटक सरकारने उद्यापासून म्हणजेच २७ एप्रिलपासून राज्यात १४ दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्नाटकातील या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवांसह बांधकाम, शेती आणि उत्पादन क्षेत्राला सूट देणात आली असून दुकाने ही फक्त सकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत अर्थात ४ तास सुरु असतील. तसेच सार्वजनिक वाहतूक देखील बंद करण्यात आली असून राज्य आणि आंतरराज्य प्रवासावरही बंदी आहे. केवळ अत्यावश्यक कारणाला ह्यात अपवाद असेल. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

कर्नाटक हे सध्या देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य आहे. राज्यात आतापर्यंत १४ हजारांहून जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला असून एका दिवसातील कोरोनाबाधितांचा आकडा २९ हजार ४३८ वर पोहोचला आहे. ही स्थिती लक्षात घेता कर्नाटक सरकारने हे कठोर निर्णय घेतले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रमिक ट्रेनमध्ये स्थलांतरित मंजुरांचा मृत्यू जेवण-पाणी न मिळाल्यान झालेला नाही | पीयूष गोयल

News Desk

राज्यात आज ५ हजार ५०५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला ३५ हजारांचा टप्पा

News Desk