HW News Marathi
Covid-19

‘…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागू शकतो’- मुख्यमंत्री

मुंबई | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, “गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचं संकट आहे आणि त्यातून मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. १६ ऑगस्टपासून राज्यातील काही बंधनं शिथिल करतो आहोत. पण कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. काही देशांत ते पुन्हा उसळलं आहे. आपल्याकडे ते उसळू नये, यासाठी काळजी घ्यायला हवी. शिथिलतेसोबतच इशाराही दिला आहे, तोही नागरिकांनी लक्षात घ्यावा.

तरी कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचं आवाहन…

स्वातंत्र्यदिनानंतर 16 ऑगस्टपासून राज्यात निर्बंध शिथिल करण्यात येत असले, तरी कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.”कोरोना काळात आपण आरोग्यसुविधा वाढवत आहोत. पण ऑक्सिजनची कमतरता चिंतेचा विषय आहे. म्हणून ही शिथिलता देत असताना ऑक्सिजनच्या साठ्याचं प्रमाण ठरवून आपण ही शिथिलता दिली आहे. “त्यामुळे कृपा करून दिलेल्या शिथिलतेमध्ये देखील आवश्यक असलेले निर्बंध पाळावे लागतील. कारण ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो,” असं ते म्हणाले.

मास्कचा वापर बंधनकारक

उपहार गृहांना रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. उपहारगृह बारमध्ये प्रवेश करताना प्रतीक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहील व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहील. उपहारगृह बारमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहील. लशीचे दोन डोस घेतलेलेच कर्मचारी उपाहारगृहात काम करू शकतील. मास्कचा वापर बंधनकारक. वातानुकुलित उपहारगृह / बार असल्यास, वायुविजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहील

राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचे सरकार नाही, शिवसेनेचे सरकार आहे !

News Desk

खाजगी डॉक्टरांना राज्य शासन पीपीई किट देणार। उद्धव ठाकरे

News Desk

बच्चन कुटुंबानंतर आता अभिनेते अनुपम खेर यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव…

News Desk