HW News Marathi
Covid-19

नागपूरमध्ये २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन, पालकमंत्री नितिन राऊत यांची घोषणा

नागपूर | नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केली. नागपूरमध्ये १५ ते २१ मार्च पर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येईल, असं नितीन राऊत म्हणाले. नागपुरातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण आढळून येत आहेत. शनिवार-रविवार बंदला प्रतिसाद मिळाला नाही. बाधित रुग्ण बाहेर पडत असल्याची माहिती आहे. त्यामुळे लॉकडाऊन करावा लागत आहे, असं नितीन राऊत यांनी सांगितलं. आम्हाला आता कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. १५ ते २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येईल. मद्य विक्री बंद राहील. लसीकरण सुरू राहील. अत्यावश्यक सेवा सुरू राहील. डोळ्यांचे दवाखाने आणि चष्म्याचं दुकान सुरू राहील, असं नितीन राऊत म्हणाले.

नागपूर शहरात १४ तारखेपर्यंत मिनी लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचं दिसून आलं. शनिवार आणि रविवार दोन दिवस बंद ठेवण्याचं आवाहन प्रशासनाने करण्यात आलं होतं. याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत मार्केट बंद ठेवले मात्र रस्त्यावर विना कामाचे फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही, त्यामुळे नागपुरात आता पुन्हा ७ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे.

नागपूरमध्ये काय सुरु काय बंद?

मद्य विक्री बंदडोळ्यांचे दवाखाने,

चष्म्याची दुकानं सुरुलसीकरण सुरु राहणार

खासगी कंपन्या बंद, सरकार कार्यालये २५ टक्के कर्मचाऱ्यांसह सुरु राहणार

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसच्या आमदारांच्या निधीतून १११ रुग्णवाहिका व ६१ लाख मास्कचे वाटप करणार !

News Desk

पतंजलीच्या ‘कोरोनील’मुळे रामदेव बाबांसह अन्य ४ जणांविरोधात गुन्हा दाखल

News Desk

महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार का? अजित पवारांनी दिली माहिती

News Desk