जळगाव । राज्यात मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारी आदी मुद्द्यांवरुन भाजपविरोधी वातावरण तयार झालं असताना, जळगाव महापालिका निवडणुकीचे धक्कादायक निकाल हाती आला आहेत. जळगाव या प्रतिष्ठीत महानगरपालिकेवर भाजपने आपला झेंडा फडकावला आहे. जळगाव महापालिकेत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवत सुरेश जैन यांची सद्दी संपवल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव महापालिकेत तब्बल ४० वर्षानंतर जळगाव महापालिकेतील सुरेश जैन गटाचं वर्चस्व संपलं आहे. भाजपने जळगाव महापालिकेच्या ७५ पैकी ५७ जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेला १५ आणि एमआयएमला ३ जागा मिळवता आल्या. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने खाते ही उघडले नाही.
एकनाथ खडसेंच्या बालेकिल्लात गिरीश महाजनांची जादू चालली आहे. पण वर्षभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी महापालिका कर्जमुक्त करण्याचं आणि जळगाव स्वच्छ सुंदर करण्याचं आव्हानही गिरीश महाजन यांना पेलावं लागेल. भाजपने ५० प्लसचे उद्देश ठेवले होते. हा आकडा पार करत भाजपने ५७ जागा मिळवल्या आहत. भाजपचा हा ऐतिहासिक विजय आहे. सुरेशदादा जैन यांची ३५ वर्षांची एकहाती सत्ता संपुष्टात आली आहे. जळगावात भाजपने स्वबळावर निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील गटाला पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेला केवळ १५ जागा मिळाल्या. खानदेश विकास आघाडीची सत्ता होती. त्यावेळी भाजपच्या १४ जागा होत्या. तिच परिस्थिती शिवसेना-खाविआवर आता आली आहे. आतापर्यंत सुरेशदादा जैन, एकनाथ खडसे आणि गुलाबराव देवकर यांनी पक्षाचे नेतृत्व केले होते. आता जळगाव जिल्ह्याला गिरीश महाजन यांच्यासारखे नवीन नेतृत्व लाभले आहे. भविष्यात गिरीश महाजन हे जिल्ह्याचे पालकमंत्री बनण्याचे संकेत आजच्या विजयातून मिळत आहेत. आजपर्यंत खविआने निवडणुका लढवल्या आहेत. यंदा खविआला शिवसेनेच बळ मिळालं होतं. तरीदेखील खविआ-शिवसेनेला सत्ता मिळवता आली नाही. खानदेश विकास आघाडी (खाविआ) आणि शिवसेनेने १५ जागा मिळवल्या आहेत. लोकांनी आम्हाला स्वीकारलं नाही. परंतु, लोकशाही महत्त्वाची आहे. भाजपने ५७ जागा मिळवल्या आहेत. भाजपने ज्या विकासकामांची घोषणा केल्या आहेत, ते भाजप एक वर्षांत पूर्ण करू शकणार नाही,’ असे शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. ‘जळगावात भाजपला ५७ जागा मिळाल्या. हा भाजपचा ऐतिहासिक विजय आहे. जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला. आम्ही विकासाचं राजकारण केलं. ५ वर्षांकरिता आम्हाला निवडून दिलं आहे. आम्ही जनतेकडे फक्त १ वर्ष मागितलं आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
previous post