HW News Marathi
महाराष्ट्र

“किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचं?आम्ही स्वतंत्रपणे आमची आंदोलने करू” – महादेव जानकर

पंढरपूर | राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांची भाजपवरील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. भाजप वीजबिलाच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. दरम्यान, जानकर यांनी भाजपच्या वीजबिल आंदोलनातून माघार घेतली आहे. किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचे? आपला पक्षही राष्ट्रीय पक्ष आहे, असं सांगत महादेव जानकर यांनी येणाऱ्या काळात भाजपासून अंतर ठेवून राजकारण करणार असल्याचे एका अर्थी संकेत दिले आहेत. पंढरपूर येथे महादेव जानकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“भाजपने वीजबिलासंदर्भात आंदोलन जाहीर केलं आहे. चांगली गोष्ट आहे. प्रत्येक पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण आम्ही मात्र भाजपसोबतच्या आंदोलनात सहभागी होणार नाही. आम्ही स्वतंत्रपणे आमची आंदोलने करू, असं महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं. भाजप हा आमचा मित्र पक्ष आहे. पण आम्हालाही आमचं अस्तित्व टिकवायचं आहे. त्यांच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही सहभागी होऊ शकत नाही. किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचं? आमचा पक्षही राष्ट्रीय पक्ष आहे. आमचा पक्ष वाढला तर कार्यकर्त्यांनाही ताकद मिळेल, असं जानकर म्हणाले. भाजप वीज बिलासंदर्भात आंदोलन करत असेल तर आमचा त्याला पाठिंबाच राहील. पण त्यांच्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार नाही”, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी आणि वीजमाफी दिलेली नाहीत. त्यामुळे त्याच्याविरोधात भाजप येत्या काही दिवसात आंदोलन करणार आहे. आधीच करोनाच्या संकटाने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना वीज बीलमाफी द्यावी, अर्थसंकल्पात तशी तरतूदच करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पावसाळ्यात मुंबईच्या होणाऱ्या ‘तुंबई’वरून नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Aprna

पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका या मागणीसाठी वारकरी शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

News Desk

नाना पटोले आणि कॉंग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट!संजय राऊतांची तक्रार केली का?

News Desk