HW News Marathi
महाराष्ट्र

महाजॉब पोर्टलच्या नव्या जाहिरातीत अखेर कॉंग्रेस नेत्यांना मिळाली जागा

मुंबई | महाजॉब पोर्टलच्या जाहीरातीवरुन महाविकास आघाडी सरकारच्या कॉंग्रेसच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. कारण या जाहिरातीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचेच फोटो होते. यात कॉंग्रेसच्या एकाही नेत्यांचा फोटो नव्हता यावरून कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे आणि खासदार राजीव सातव यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

आता नव्या जाहीरातीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खालोखाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोटो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भव्य फोटो डावीकडे आहे, तर उजव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, तसेच क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री अदिती तटकरे यांचे फोटो आहेत.

युवक कॉंग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. ‘महाजाॅब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काॅंग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे’, असे ट्विट त्यांनी केले होते.

 

राजीव सातव यांनी काय केले होते ट्विट?

“योजना चांगली आहे आणि आमचे पूर्ण सहकार्य आहेच. फक्त सरकार आघाडीचे आहे याची काळजी लोकांसमोर जाताना सर्वांनीच घ्यायला हवी. येत्या काळात या जाहिरातीत दुरुस्ती होईल अशी आशा. पुन्हा अशी चूक होणार नाही या खात्रीसोबत”, असे ट्विट सातव यांनी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे-भाजप युती होईल का? प्रविण दरेकरांचे सुचक वक्तव्य

News Desk

अजित पवारांनी रोहित पवारांना भर सभेत खडसावल, ”अरे शहाण्या… तू आमदार आहेस”

News Desk

महाराष्ट्रात होणार जी २० परिषदेतील १३ बैठका; मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी घेतला नियोजनाचा आढावा

Aprna