HW News Marathi
Covid-19

यंदा आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नको | पडळकर

मुंबई | “यंदा आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते नको”, अशी मागणी भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज (२४ जून) केली आहे. याचे कारण सांगताना गोपीचंद पडळकर म्हणतात कि, “पंढरपुरात बाहेरून लोकांना येण्यास विरोध आहे. मुख्यमंत्री देखील मुंबईहून येणार. मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. त्यामुळे यंदा आषाढी आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते नको”, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे.

“यंदाची आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नव्हे तर स्थानिक वारकरी कुटुंबाच्या हस्ते करण्यात यावी”, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. याबाबत अधिकचे स्पष्टीकरण देताना पडळकर म्हणाले, “मागे इथल्या स्थानिकांनी जेव्हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महापूजेसाठी विरोध केला होता तेव्हा त्यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर विठुरायाचे पूजन केले होते.त्याचपद्धतीचे पूजन विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही करावे”, असे पाडळकरांनी सुचविले आहे.

दरवर्षी पंढरपुरात आषाढी एकादशीची महापूजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होण्याची प्रथा महाराष्ट्रात वर्षानुवर्षे चालत आली आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे हे पहिलेच वर्ष आहे. दुसरीकडे राज्यावर कोरोनाचे संकट आहे. अशातच गोपीचंद पाडळकरांनी “यंदा आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नको”, अशी मागणी केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वेळीच नियंत्रण मिळवा नाहीतर…, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवरून WHO चा इशारा

News Desk

देशात आजपासून ‘लस उत्सव’ला सुरुवात, सर्वाधिक नागरिकांपर्यंत लस पोहोचवण्याचा हेतू

News Desk

यवतमाळमध्ये चिंता वाढली ! जिल्हाधिकारी ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये

News Desk