मुंबई | देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या २८०१ वर पोहोचली आहे. राज्यात आज (१५ एप्रिल) ११७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
Maharashtra: 117 new cases recorded today in the state, of which 66 are from Mumbai and 44 from Pune. The total number of positive cases in the state stands at 2801 now. pic.twitter.com/T3DgqUpRQm
— ANI (@ANI) April 15, 2020
आज मुंबई ६६, पुणे ४४, ठाणे ३, वसई-विरार, आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एक, मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाचे 2 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आता राज्यात कोरोना बाधितांची संख्या २८०१ वर गेली आहे. सध्या राज्यात ६७ हजार ७०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ५,६४७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. कोरोनाबाधित २५९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.