मुंबई | राज्यातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर आज (८ ऑगस्ट) मागे घेण्याची घोषणा सेंट्रल मोर्डने केली आहे. मेस्मा दाखल करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर डॉक्टराना त्वरित सेवेत रुजू होण्यास सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (८ ऑगस्ट) रात्री उशिरापर्यंत डिएमइआर सोबत झालेल्या बैठकीत १५ दिवसांत विद्यावेतनाचा मुद्दा निकालात काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर आज सकाळी सेवेत दाखल झाले.
Maharashtra Association of Resident Doctors (MARD) “temporarily calls off its agitation on humanitarian grounds until further notice” in view of the flood situation in the state & abrogation of Article 370 pic.twitter.com/Ip38YrclFa
— ANI (@ANI) August 8, 2019
गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना विद्यावेतन मिळालेले नाही. तसेच मागील दीड वर्षापासून कायमच विद्यावेतनासाठी मार्डच्या डॉक्टरांना आंदोलन करावे लागत आहे. राज्यभरातील सरकारी तसंच महापालिका रुग्णालयांमधील सुमारे ४ हजार ५०० निवासी डॉक्टरांनी ७ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला होता. परंतु राज्यातील पूरस्थिती आणि आजारांचा प्रादुर्भाव पाहता हा संप मागे घेतल्याचं मार्डच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यामुळे सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर ३१ ऑगस्ट रोजी पुन्हा संप पुकारण्यात येईल, असा इशाराही मार्डने दिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.