HW News Marathi
महाराष्ट्र

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक!

मुंबई। शेतकऱ्यांच्या विरोधात उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध म्हणून सत्तेत असलेल्या महा विकास आघाडी सरकारने अर्थातच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आज, (11 ऑक्टोबर) ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली आहे. अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने सारे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे. या बंदला आधी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, नंतर बंदला पाठिंबा देत असल्याचे व्यापाऱ्यांनी जाहीर केले.

काय बंद काय सुरू?

नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मेडिकल स्टोअर्स, दूध पुरवठा, रुग्णालये इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद राहणार आहेत.

महाराष्ट्र बंदला भाजपने विरोध दर्शवला आहे. भाजपप्रमाणेच व्यापारी संघटनांनीही बंदला विरोध दर्शविला होता. मात्र, शिवसेना बंदमध्ये सहभागी असल्याने मुंबई, ठाण्यातील व्यापाऱ्यांची कसोटी लागणार असल्याचे चित्र दिसत होते. बंदला विरोध करणार असल्याचे रविवारी सकाळी स्पष्ट करणाऱ्या मुंबईतील व्यापाऱ्यांनी रविवारी रात्री मात्र बंदला पाठिंबा देण्याची घोषणा केली. शिवसेना आणि अन्य पक्षांच्या विनंतीनुसार सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा देण्यात येत असून, सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांचं वक्तव्य…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लखीमपूर हिंसाचारावर चर्चा करण्यात आली. त्या घटनेत निधन झालेल्या व्यक्तींना मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. यादिवशी अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व दिवसभर बंद राहिल अशी माहिती मंत्री जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर यांनी दिली होती. हा बंद पक्षाच्या वतीने आहे सरकारच्या वतीने नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं होतं. तर शेतकऱ्यांचा पाठीशी शिवसेना नेहमी राहिली आहे, त्यामुळे बंदमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. शेतकरी आंदोलन चिरडताना भाजपची मानसिकता दिसून आली, जनरल डायरच्या भूमिकेत भाजप दिसून आली, असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते.

‘मुंबई डबेवाला असोशिएशनचा’ जाहीर पाठिंबा

‘मुंबई डबेवाला असोशिएशन’ निषेध करत आहे. भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने त्याची कार आंदोलक शेतकऱ्यांवर चढविल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री तिथे आपला मुलगा नव्हता असा दावा करत आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रकरण वाढत असल्याचे पाहून या मंत्रीपुत्रावर गुन्हा दाखल केला आहे. परंतू ८ जणांचा मृत्यू झालेला असला तरी देखील म्हणावा तसा तपास पोलिसांनी केला नाही. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. येत्या ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलं आहे. या महाराष्ट्र बंदला ‘मुंबई डबेवाला असोशिएशन’ जाहीर पाठिंबा देत आहे, असं मुंबई डबेवाला असोशियसनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी म्हटलं आहे.

बंदमध्ये शिवसेना अग्रेसर

विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आले असता पत्रकारांशी बोलताना म्हणाले की उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेना अग्रेसर असणार असून महाविकास आघाडीतर्फे निषेध म्हणून उद्याचा बंद यशस्वी करणार आहे. यासोबतच अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील या बंदला पाठिंबा दिला आहे.

काँग्रेसच्या वतीने राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन

प्रदेश काँग्रेसच्या वतीने आज, राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विविध नेते त्यात सहभागी होतील. दरम्यान, बंद यशस्वी होऊ नये म्हणून भाजपनेही विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपच्या विविध संघटना किंवा कामगार संघटनांनी व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हजारो कोटींचा घोटाळाकरून पळालेल्या नीरवमोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही

News Desk

मराठा आरक्षणामागे राजकीय षडयंत्र, अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

News Desk

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का देत राष्ट्रवादीत येणारे कल्याणराव काळे आहेत कोण?

News Desk