HW News Marathi
महाराष्ट्र

कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष, नवनिर्वाचित आमदारांना देणार शपथ

मुंबई | विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी आमदार कालिदास कोळंबकर यांनी नियुक्ती झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवना जाऊन कोळंबकरांना आज (२६ नोव्हेंबर) शपथ घेतली आहे. उद्या बहुमत चाचणी होणार, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. बहुमताची चाचणी हंगामी अध्यक्ष घेणार म्हणून कोळंबकरांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

विधीमंडळ सचिवालयांच्या कार्यालयाने विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी सहा ज्येष्ठ आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांच्या कार्यालयाला यादी पाठवली आहे. या यादीत भाजपचे कालिदास कोळंबकर यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, काँग्रेस बाळासाहेब थोरात, के. सी. पाडवी आमदारांच्या समावेश करण्यात आला होता. या ६ नेत्यांतून कोळंबकरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोळंबकर हे वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून गेले आहेत. या मतदारसंघातून ते सातवेळा निवडून आले आहेत. २०१४च्या निवडणुकीत देशात आणि राज्यात मोदी लाट असतानाही कालिदास कोळंबकर यांनी भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव केला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत कालिदास कोळंबकर यांनी भाजपत प्रवेश करत पुन्हा विजय मिळविला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात, कोरोना योद्ध्यांना केले अभिवादन

News Desk

संभाजीराजेंनी त्यावेळी संसदेत तोंड का उघडले नाही?, कोळसे-पाटलांचा सवाल

News Desk

नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी बोलणार नाही ! – शरद पवार

News Desk