HW News Marathi
देश / विदेश

सर्कशीतला विदुषक जेव्हा पडतो तेव्हा लोक हसतात !, भाजपची बोचरी टीका

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. संपूर्ण देशातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर, आज (१ ऑक्टोबर) या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे उत्तर प्रदेशमधील संबंधित ठिकाणी दाखल झाले. यावेळी, प्रचंड जमावात उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत राहुल गांधी खाली कोसळेल. या प्रकारानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात असताना महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी बोचरी टीका केली आहे.

“सर्कशीतला विदुषक जेव्हा पडतो तेव्हा लोक हसतात”, असे ट्विट करत अवधूत वाघ यांनी राहुल गांधींवर बोचरी टीका केली आहे. पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असलेल्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या ताफ्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले. त्यानंतर, हे दोन्ही नेते आणि काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते पायी चालत निघाले. मात्र, यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी या दोन्ही नेत्यांना ताब्यात घेतले. तसेच, या ठिकाणी राहुल गांधींनाही उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचे दिसले. या धक्काबुक्कीदरम्यान राहुल गांधी खाली कोसळले. याच पार्श्वभूमीवर अवधूत वाघ यांनी ही टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Republic Day | पहिले चार प्रजासत्ताक दिन इथे साजरे झाले

News Desk

मनसुख मांडवीया यांनी केली राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम 2022 ची सुरवात

News Desk

धक्कादायक ! प्रसूती करण्यापूर्वी दोन डॉक्टर एकमेकांशी भांडत राहिले.. बाळाचा गर्भात जीव गेला

News Desk