HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील-अमित शहांची दिल्लीत भेट, बीएमसी निवडणुकीबाबत चर्चा – सूत्र

मुंबई | महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल (२५ नोव्हेंबर) नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. या दोघांच्या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली?, तर राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती प्रसार माध्यमातून मिळाली आहे. पाटलांनंतर आज (२६ नोव्हेंबर) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवी सुद्धा दिल्लीत झाल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या नवीन प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी शाहा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पुण्यात येणार आहेत. महापालिका भवनातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन आणि पालिकेच्या नव्या इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे अनावरण शाहांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका होणार आहेत. या पारश्वभूमीवर भाजपची निवडणुकीसाठी कोणती रणनिती काय असणार यावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यात सध्या कोणतेही निर्बंध आणि लॉकडाऊन नाही”, राजेश टोपे

News Desk

सुनील तटकरेंचा ‘सेल्फी विथ खड्डा’

News Desk

शरद पवार ते अनिल देशमुख ! महाविकासआघाडीच्या या नेत्यांची केलीय Ed, CBI ने कोंडी

swarit