HW News Marathi
महाराष्ट्र

‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही’, नारायण राणेंचा टोला!

नवी दिल्ली। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाराष्ट्रातील चार नेत्यांना केंद्रात संधी मिळाली आहे. यात नारायण राणेंना संधी देण्यात आली असून त्यांचा शपथविधी देखील पार पडला आहे. नारायण राणे याच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नारायण राणे यांनी आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारला असून यावेळी त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरेंनी फोन करुन शुभेच्छा दिल्या का? असं ज्यावेळी माध्यमांनी विचारलं त्यावेळी नारायण राणे म्हणाले की, “नाही त्यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यांचं मन इतकं मोठं नाही. पण त्यांनी शुभेच्छा दिल्या नसल्या तरी संपूर्ण महाराष्ट्र आणि जिल्ह्यांमधून मला शुभेच्छा मिळाल्यात या मी त्यांच्या शुभेच्छा समजतो”. दरम्यान शरद पवारांनी मला शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्याची माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली.

तेव्हा संजय राऊतचं हे खातं चांगलं –

संजय राऊत यांना काही ना काहीतरी बोलायचंच असतं. चांगलं नाही वाईटच बोलायचं असतं. म्हणून संजय राऊत यांना सांगेन खातं बरं वाईट नसतं, तर काम कसं करतो हे महत्वाचं असतं. या खात्याला मी जेव्हा न्याय देईन तेव्हा संजय राऊतचं

हे खातं चांगलं आणि मोठं होतं असं म्हणतील,” असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

एकीकडे खुशी तर दुसरीकडे टोला-

राणेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर राऊतांनी राणेंचं अभिनंदन करत, महाराष्ट्राच्या नेत्याला मंत्रिपद मिळाल्याने आम्हालाही खुशी असल्याचं दाखवलं. पण दुसऱ्या बाजूला पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनेच्या भाषेत उत्तर दिलं राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. पण त्यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. तरीही आमच्या राणेंना शुभेच्छा आहेत, असं खुशीवालं उत्तर पहिल्यांदा दिलं… तर ‘शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंना मंत्रिपद दिलं असेल तर हा मोदींच्या कॅबिनेटचा अपमान आहे’, असं मनातील उत्तर राऊतांनी दिलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

News Desk

सकाळी टीका,दुपारी OBC अध्यादेशावर सही, 12 तासांत दुसऱ्या सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांचे आभार!

News Desk

विरोधकांनी स्वतःचे वजन केंद्र सरकारकडे वापरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी-अब्दुल सत्तार

News Desk