HW News Marathi
महाराष्ट्र

Live Update : १६९ आमदारांसह महाविकासआघाडीकडून बहुमत सिद्ध

मुंबई | उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपजाचा पदभार स्वीकारला आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारची बहुमत चाचणी आज (३० नोव्हेंबर) सामोरे जावे लागणार आहे. विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असून हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात येणार आहे. महाविकासाआघाडीने जवळपास १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ३ डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

  • शिरगणतीनुसार, विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. त्यानुसार १६९ महाविकासआघाडी बुहमताने मंजूर झाला आहे.
  • महाविकासआघाडीचा विश्वासदर्शक ठराव १६९ मतांनी पारित झाला आहे. आणि ४ आमदार हे तटस्थ, एमआयएम, माकप,मनसे या पक्षांच्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली.

  • विश्वासदर्शक ठरावाची मतमोजणी करण्यास सुरूवता, मतमोजणी वेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी १५ ऐवजी २०चा अकडा सांगितला.
  • सभागृहाचे सर्व दरवाजे बंद करण्याचे आदेश हंगामी अध्यक्ष वळसे पाटील यांनी दिले
  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतांची मतमोजणी होणार

  • भाजपच्या आमदारांनी सभात्याग करत, विधानसभेच्या घोषणाबाजी करत बाहेर आले.
  • काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठरवा मांडला आहे, चव्हाण यांनी ठरवा मांडल्यानंतर शिवसेनेच्या वतीने सुभाष देसाई आणि राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील यांनी विश्वासदर्शक प्रस्तावाला अनुमोदन दिले
  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सुरूवात करण्यास वळसे पाटील यांनी सांगितले
  • ७ दिवसाच्या आता पुन्हा अधिवेशन घेता येते, मात्र, फडणवीस यांचा अक्षेप अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळून लावला

  • विधानसभेत दादागिरी नही चलेगी, विरोधकांचा गोंधळ घालण्यास सुरुवात
  • नव अधिवेशनाच्या सुरुवाततीला वंदे मातरम् का नाही?, असा सवला फडणवीस यांनी उपस्थित केला

  • शपथविधी सोहळ्यात राष्ट्रगतीचा अपमान झाला असल्याचे फडणवीसांनी सभागृहात सांगितले
  • २७ नोव्हेंबरला अधिवेशन स्थगित केले होते.मग काल (२९ नोव्हेंबर) अधिवेशन कसे बोलविले, असा सवाल फडणवीसांनी विचारला
  • भाजपचे विरोध पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाला सुरूवात, हे विधानसभेचे अधिवेशन हे नियमबाह्य असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
  • काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या महाविकासआघाडीच्या तिन्ही पक्षाकडून त्यांच्या आमदारांना व्हिप बजावला
  • सभागृहात जय श्रीराम, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा घोषणा देण्यात आले
  • विधानसभेत बहुमताच्या चाचणीला सुरूवात झाली आहे.

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करत, बहुमत चाचणीसाठी विधानसभेत दाखल झाले आहेत

  • माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बहुमतांच्या चाचणीसाठी विधानसभेत दाखल झाले आहेत.
  • राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील बहुमताच्या चाचणीसाठी विधानसभेत दाखल झाल्या आहेत

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल
  • शिवसेनेकडून सर्व आमदारांना व्हीप जारी
  • राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारांना व्हीप जारी
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक सुरू
  • रडीचा डाव खेळण्याचा भाजपचा प्रयत्न – एकनाथ शिंदे
  • उद्धव ठाकरे विधानभवनाच्या दिशेने रवाना
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी नाना पटोले यांचा अर्ज दाखल

  • महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव घोषित
  • भाजपने आम्हाला धमक्या देऊ नयेत – नवाब मलिक
  • नव्या सरकारने शपथ घेताच सगळे नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केल्याचा आरोप भाजपचे प्रदेध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाटील पुढे म्हणाले की, विधानमंडळाच्या नियमांची पायमल्ली सरकारने केली. महाविकासआघाडीने शपथ घेताना प्रोटोकॉल पाळला गेला नाही. शपथविधीविरोधात राज्यपालांकडे याचिका दाखल होणार, असल्याची माहिती देखील पाटलांनी माध्यमाशी बोलातना दिली.

  • उपमुख्यमंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय शरद पवार निर्णय घेतील – जयंत पाटील
  • उपमुख्यमंत्रिपदाच्या नावाबाबत अद्याप कोणताही निर्णय राष्ट्रवादीकडून घेण्यात आला नाही – जयंत पाटील
  • विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून जे नाव जाहीर केले जाईल त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा – राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
  • उपमुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद नाही तर उपमुख्यमंत्रिपद हे राष्ट्रवादीलाच मिळणार, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिली आहे
  • विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले अर्ज भरणार, बाळासाहेब थोरातांची माहिती

  • विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजप अकरा वाजता अर्ज भरणार
  • विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून किसन कथोरे, बबनराव लोणीकरांच्या नावाची चर्चा

  • गैरसमज करु नका, प्रताप पाटील चिखलीकर भाजपमध्येच आहेत, मी राष्ट्रवादीतच आहे, आम्ही केवळ सदिच्छा भेट म्हणून भेटलो, विश्वासदर्शक ठरावाची अजिबात चर्चा नाही, तो ठराव लाईव्ह असेल, असे अजित पवार यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, संजय राऊतांनी सांगितल्याप्रमाणे १७० चा आकडा गाठू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • अजित पवार आणि प्रतापराव चिखलीकर यांची भेट संपली
  • हमसे जमाना खुद है… जमाने से हम नहीं… संजय राऊत यांचे नवे ट्विट

  • नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर अजित पवार यांच्या भेटीला
  • शिवसेनेचे सुनील प्रभू, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मांडणार
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडणार, आज दुपारी दोन वाजता सत्ताधारी महाविकासआघाडीतर्फे विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंदिरात जाऊन दर्शन घेणे प्रत्येकाच्या श्रध्देचा भाग यावरून राजकारण करू नये !

News Desk

भारतीय पोलिस जगातील सर्वोत्कृष्ट;त्यांच्या देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान-अजित पवार

News Desk

ऑटोरिक्षा व टॅक्सी भाडेदर ठरविण्यासाठी ऑनलाईन अभिप्राय नोंदवा 

News Desk