HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री आज मुंबईतील कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा, महापालिका आयुक्तांची बोलावली बैठक

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन केला आहे तर काही जिल्ह्यांत संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२३ फेब्रुवारी) महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली आहे. वर्षा निवासस्थानी संध्याकाळी ५.३० वाजता ही बैठक बोलवण्यात आली आहे. तसेच, या बैठकीआधी मुख्यमंत्री महापालिका आयुक्तांनाही ४.३० वाजता वर्षा निवासस्थानी भेटणार आहेत. मुंबईतील एकूण कोरोना स्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

तसेच, २१ फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याने आणखी काळजी घेण्याचे आवाहन लोकांना केले आहे. तसेच, ८ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून या ८ दिवसांत कोरोना स्थिती राज्यातील कशी आहे याचा आढावा घेत मगच लॉकडाऊनचा विचार करु असे सांगितले आहे. तसेच, मास्क घाला, कोरोना टाळा, सोशल डिस्टन्स पाळा, कोरोना टाळा असे आवाहनही यावेळी त्यांनी जनतेला केले आहे. त्यामुळे आजची कोरोना संदर्भातील बैठक ही मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोरोनाच्या तिसरी लाटेत लहान मुलांची काळजी कशी घ्याल ?”, मुख्यमंत्री म्हणाले…

News Desk

देशात गेल्या २४ तासांत ४७,७०४ नवे कोरोना रुग्ण, तर ६५४ जणांचा झाला मृत्यू

News Desk

साखरेवर बोल्यावर मिरची का लागली ?, निलेश राणे-रोहित पवारांमध्ये रंगले वाकयुद्ध

News Desk