HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्र काँग्रेसने ४ हजार ६२७ स्थलांतरित मंजुराचा उचलला खर्च

मुंबई | कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे देशातील इतर राज्यात अडकून पडलेल्या श्रमिक आणि कामगारांना त्यांच्या राज्यात परत पाठविताना त्यांच्याकडून रेल्वेचा प्रवास खर्च राज्यातील काँग्रेस करणार असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी घोषणा केली होती. सोनिया गांधींनी केलेल्या घोषणेनुसार गेल्या दोन दिवसात महाराष्ट्राच्या विविध भागातून आपल्या राज्यात परतणाऱ्या ४ हजार ६२७ गरजू स्थलांतरित मजुरांच्या प्रवासाचा खर्च महाराष्ट्र काँग्रेसने केल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

स्थलांतरित मजुरांचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून प्रत्येक जिल्हानिहाय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व व खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीने २३९ स्थलांतरित मजूरांची पाटणा येथे जाण्याची व्यवस्था स्वखर्चाने केली.

याशिवाय स्थलांतरित मजुरांच्या आरोग्याची तपासणी, त्यांचा फॉर्म भरण्यास मदत, त्यांना प्रवासादरम्यान पाणी, जेवण, सॅनिटायझर, मास्क आदी गोष्टींचीही उपलब्धता काँग्रेसकडून करण्यात येते आहे.दरम्यान नागपूर ते मुज्जफरपूर आणि वर्धा ते पाटणा या रेल्वेतून प्रवास करणा-या सर्व २०१९ मजूरांच्या तिकीटाचा खर्च काँग्रेस पक्षाने केला. ऊर्जामंत्री मंत्री नितीन राऊत, पशुसंंवर्धन मंत्री सुनील केदार, आमदार रणजित कांबळे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईमध्ये आठवडाभरात ५०० आयसीयू बेड्स नव्याने उपलब्ध होणार

News Desk

राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना जारी, प्रवाशांना १४ दिवस घरीच राहणे बंधनकारक

News Desk

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचे महाराष्ट्राचे स्वप्न धुळीस

News Desk