HW News Marathi
देश / विदेश

‘हे’ भाजपने ठाकरे सरकारविरोधात रचलेले कुटील षडयंत्र !

मुंबई । भाजपकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केलेल्या मोठ्या गौप्यस्फोटांमुळे ठाकरे सरकारची पुरती कोंडी झाली आहे. गृहमंत्र्यांवर करण्यात धक्कादायक आरोपांमुळे राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे. एकीकडे राज्याचे गृहखाते आणि ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याची संधी भाजप साधत असताना महाराष्ट्र काँग्रेसकडून भाजपवर आरोप होत आहेत.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी या पार्श्वभूमीवर ट्विट करत भाजपवर गंभीर टीका केली आहे. सचिन सावंत ट्विट करत म्हणतात की, “केंद्रीय यंत्रणांच्या दबावाखाली अधिकाऱ्यांना आणून भाजपाने मविआ सरकारविरोधात अत्यंत कुटील षडयंत्र केलेले दिसत आहे. भाजपा नेत्यांना माहिती आधीच मिळते व ज्या सुसुत्रपणे ते प्रतिक्रिया लागलीच देतात त्यातून हे स्पष्ट होते.” नेमके सचिन सावंत काय म्हणाले पाहूया.

काय म्हणाले सचिन सावंत ?

महाराष्ट्रातही विनोद राय प्रवृत्तीचे लोक प्रशासनात आहेत. सत्यपाल सिंह आघाडी सरकारला कळले नाही. जे पत्र दिसत आहे त्यामध्ये पश्चात बुध्दी दिसत आहे. जे संभाषण आज दाखवले जात आहे ते वर्षभरापूर्वीच झाले असते. अँटेलीया प्रकरण झाल्यानंतर कोणीही सामान्य बुद्धीचा व्यक्ती ही असे करणार नाही

जे खंडणीचे आरोप सांगितले जात आहेत ते भाजपाने आधीच कसे केले? सुशांत सिंह राजपूत याची केस पटणा येथे नोंदवली जाऊ शकते तर मोहन देलकर यांची मुंबईत आत्महत्या झाली तिथे का नाही? जीथे गुन्हा घडला तिथेच CRPC प्रमाणे तपास होतो. SMS हे स्वबचावाकरिता दिसत आहेत.अगोदर काही अधिकारी दिल्लीच्या

दबावात आहेत असे गृहमंत्र्यांनी महिनाभरापूर्वी सांगितले होते. केंद्रीय यंत्रणांच्या दबावाखाली अधिकाऱ्यांना आणून भाजपाने मविआ सरकारविरोधात अत्यंत कुटील षडयंत्र केलेलं दिसत आहे. भाजपा नेत्यांना माहिती आधीच मिळते व ज्या सुसुत्रपणे ते प्रतिक्रिया लागलीच देतात त्यातून हे स्पष्ट होते

जी तत्परता अंबानी प्रकरणात केंद्राने दाखवली ती देलकर प्रकरणात का नाही? देलकर यांनी मोदी शाह यांना पत्र लिहून व्यथा मांडली. पण त्याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी राजीनामा दिला का? देलकर प्रकरणात भाजपाचे हात अडकले असून हे दाबण्यासाठी कुभांड रचलं गेले आहे हे पत्रातून स्पष्ट होत आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बेळगावमध्ये मराठी माणसाचा नाही तर संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव” फडणवीस

News Desk

करुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंरीत, २ जणांचा मृत्यू ४० जखमी

swarit

… जेव्हा जिन्ना भगतसिंग यांना मदत करु इच्छितात

News Desk