मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचे रविवारी (१४ जून) दुपारी आत्महत्येच्या कारणाने निधन झाले आहे. मुंबई पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ही घटना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी घडली. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला. या वृत्तानंतर सुशांतच्या बॉलिवूडसह चाहत्यांपासून अगदी सर्व क्षेत्रातील दिग्गजांकडून शोक व्यक्त केला गेला. मात्र, याचसोबत सोशल मीडियावर अत्यंत धक्कदायक आणि निंदनीय असा प्रकार पाहायला मिळाला. संपूर्ण सोशल मीडियावर काल सुशांतच्या मृतदेहाचे फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. याच पार्श्वभूमीवर, आता महाराष्ट्र सायबर सेलनेही या प्रकारचा तीव्र निषेध नोंदवत अशांवर कायदेशीर कारवाईचा कडक इशारा दिला आहे.
A disturbing trend has been observed on Social Media platforms by Maharashtra Cyber that pictures of deceased actor Shri. Sushant Singh Rajput are being circulated, which are disturbing and in bad taste. (1/n)
— Maharashtra Cyber (@MahaCyber1) June 14, 2020
It is emphasised that circulation of such pictures is against legal guidelines and court directions, and are liable to invite legal action. ⁰(2/n)
— Maharashtra Cyber (@MahaCyber1) June 14, 2020
महाराष्ट्र सायबर सेलने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हणण्यात आले आहे कि, “देशभरात सोशल मीडियावर सध्या एक अत्यंत चिंताजनक ट्रेंड दिसून येत आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या मृतदेहाचे फोटोज व्हायरल केले जात आहेत. हे अत्यंत क्लेशदायक आहे. सोशल मीडियावर असे फोटो व्हायरल करणे हे कायदेशीर मार्गदर्शक सूचना आणि न्यायालयीन आदेशांच्या पूर्णपणे विरोधात आहे. कोणीही अशा पद्धतीने अशी कृती केल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र सायबर सेलकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, बॉलीवूड कलाकारांसह चाहत्यांकडून सुशांतचे असे फोटोज अपलोड, व्हायरल न करण्याबाबत वारंवार आवाहन करण्यात आले, या प्रकारचा निषेधही नोंदवण्यात आला. मात्र, त्यानंतरही हे फोटोज व्हायरल होत राहिले.
My friend #SushantSinghRajput has died tragically at a very young age!! STOP Circulating pictures of his death! This is a tragedy NOT entertainment!! Is this the world we live in now??!
— TheFarahKhan (@TheFarahKhan) June 14, 2020
12 large MOU’s with companies from across the globe including US, China, South Korea, Singapore& India will be signed today in presence of honourable @CMOMaharashtra& Industries Minister @Subhash_Desai ji. Maharashtra #MadeForBusiness
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) June 15, 2020
Also stop sending him those pictures to confirm those are the real pictures. How cruel and heartless and desperate. SHAME!!! https://t.co/ZME6GMSkTg
— Anubhav Sinha (@anubhavsinha) June 14, 2020
त्याचप्रमाणे, “अभिनेता सुशांतचे ‘ते’ फोटोज यापुढे व्हायरल करणे टाळावे. तसेच यापूर्वी पोस्ट केले फोटोज देखील तातडीने काढून टाकण्यात यावेत”, अशा सूचनाही सायबर सेलकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.