HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र संचालनालयाने सात वर्षांनंतर जिंकला सर्वोत्तम संचालनालयाचा चषक

मुंबई | राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाच्या ५७ जवानांच्या तुकडीने नुकताच समारोप झालेल्या या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये पंतप्रधान सन्मान प्राप्त केला आहे. अनेक चषके आणि पदके जिंकण्यासोबतच एकंदर कामगिरीत ही तुकडी सर्वोत्तम ठरली आहे. महाराष्ट्र संचालनालयाने सात वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा सर्वोत्तम संचालनालयाचा चषक जिंकला आहे.

या वर्षीच्या म्हणजे २०२२ च्या प्रजासत्ताक सोहळ्यात सहभागी झालेल्या ५७ जवानांच्या तुकडीमधील १७ जवानांनी अखिल भारतीय राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रतिनिधित्व करत राजपथावरील संचलनात भाग घेतला तर पंतप्रधानांच्या सन्मानार्थ झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय छात्र सेनेच्या गार्ड ऑफ ऑनर रॅलीमध्ये ७ जवान सहभागी झाले होते.

राज्यात १ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या सन्मान समारंभात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिन २०२१-२२ च्या संचलन शिबिरादरम्यान अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सर्वोत्कृष्ट जवानांचा आणि पारितोषिक विजेत्यांचा पारितोषिके देऊन सन्मान केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमाचे यजमानपद भूषविले आणि छात्र सेनेच्या जवानांशी संवाद साधला.

पंतप्रधानांच्या रॅलीदरम्यान सिनियर अंडर ऑफिसर गीतेश दिनगर यांना गार्ड कमांडर म्हणून प्रतिष्ठित पंतप्रधान ध्वजाला सलाम करण्याचा सन्मान मिळाला. कॅडेट वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटील यांची हवाई विभागाच्या वरिष्ठ विभागाकडून अखिल भारतीय सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून निवड झाली. महाराष्ट्रातील ५ कॅडेटना देखील राष्ट्रीय छात्र सेनेच्या महासंचालक प्रशंसा पत्रे देऊन गौरविण्यात आले.

दरम्यान, या प्रसंगी राज्यमंत्री सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि अदिती तटकरे, राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी, संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी, ग्रुप कमांडर्स, अधिकारी आणि इतर कर्मचारीवर्ग देखील उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांची केंद्रावर टीका

News Desk

गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हाला देखील आत्महत्या करावी लागेल

News Desk