मुंबई | देशांतर्गत विमान सेवा उद्यापासून (२५ मे) सुरू होणार आहे. मुंबईतून प्रत्येकी २५ विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफला परवानगी दिली आहे. हळूहळू हा आकडा आणखी वाढेल, अशी माहिती कॅबिनटे मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकार लवकरच नियमावली प्रसिद्ध करेल, असेही मलिक यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला आज (२४ मे) सांगितले.
Maharashtra govt has agreed to allow 25 take offs and 25 landings everyday for domestic flights from Mumbai. This number will be increased gradually. State govt will issue details and guidelines in this regard soon: Maharashtra Minister Nawab Malik. (File pic) pic.twitter.com/VnctP8YpK5
— ANI (@ANI) May 24, 2020
दरम्यान, देशांतर्ग विमानसेवेकरिता विमानतळावर तयारी करण्यास थोडा वेळ देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना सांगितले. तसेच “रेड झोन मधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटमध्ये म्हणाले.
ग्रीन झोन मधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून संसर्ग/ प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोका ही वाढेलच!#PlanningOverAdHocism#MaharashtraGovtCares
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 23, 2020
अनिल देशमुख म्हणाले “स्वॅब शिवाय प्रवाशांचे नुसतं थर्मल स्कॅनिंग चा काय फायदा? सद्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटिव प्रवाशाला रेड झोन मध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे,” असे ते म्हणाले. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले, “ग्रीन झोन मधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून संसर्ग/ प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोका ही वाढेलच!”
संबंधित बातम्या
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.