HW News Marathi
Covid-19

‘रेड झोन’मधील विमानतळ अशा परिस्थितीमध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक !

मुंबई | येत्या २५ मेपासून देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्यास केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने परवानगी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ट्वीट करून दिली आहे. मात्र, देशांतर्ग विमानसेवेला केंद्री सरकारच्या परवानगीला राज्याचे गृहंत्री अनिल देशमुख यांनी विरोध केला आहे. तसेच देशमुख यांनी काल (२३ मे) ट्वीट करत ‘रेड झोन मधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे,’ असे म्हणाले.

अनिल देशमुख यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “रेड झोन मधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे.स्वॅब शिवाय प्रवाशांचे नुसतं थर्मल स्कॅनिंग चा काय फायदा? सद्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटिव प्रवाशाला रेड झोन मध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे,” असे ते म्हणाले. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले, “ग्रीन झोन मधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून संसर्ग/ प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोका ही वाढेलच!”

२५ मार्चला देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. तेव्हापासून देशांतर्गत विमानसेवा बंद आहे. देशांतर्गत ३३ टक्के विमानसेवा पूर्वपदावर आणणार असल्याचे पुरींनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. देशांतर्ग विमान सेवासाठीही काही अर्टी आणि शर्तीवर सुरू होणार आहे. सध्या देशाबाहेर अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सरकारचे वंदे भारत मिशन सध्या सुरू आहे. पण आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीस मात्र सरकारने अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही.

संबंधित बातम्या

देशांतर्गत विमानसेवा २५ मेपासून सुरू होणार

देशांतर्गत विमानप्रवासासाठी ‘या’ आवश्यक अटी व शर्थी

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलीच्या मांडव टहाळीतील डान्स पडला महागात, भाजप आमदार महेश लांडगेंसह 60 जणांवर गुन्हा

News Desk

जनता कर्फ्यूप्रमाणेच नागरिकांनी आपली पुढची जीवनशैली बदलावी – तुकाराम मुंढे

News Desk

आजपासून मुंबईमध्ये इलेक्ट्रॉनिक्स व हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी

News Desk