HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

“सुनलो हमारी बात…” आमदार बच्चू कडूंचे पावसात सरकारविरोधी आंदोलन

मुंबई | प्रहार क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. कडू यांनी राज्य सरकार विरोद्धात हे आंदोलन सुरू केलेल्याचे त्यांनी सांगितले आहे. विधिमंडळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच चक्क पडत्या पावसात कडूंनी आंदोलनास बसले आहे. विधानसभेच्या विधिमंडळ अधिवेशनाचा आज (२ जुलै) शेवटचा आहे. कडू यांच्या मतदारसंघातील समस्यांकडे सरकार जाणून-बुजून दुर्लक्ष करत असून त्यांच्या मतदारसंघातील कामांना केवळ मंजुरी दिली. मात्र सरकार निधी देत नसल्याचा आरोप करत कडूंनी हे एकदिवसीय आंदोलन पुकारले आहे.

आता विधानसभेेचे पुढील अधिवेशन हे नव्या सरकारचे पहिले अधिवेशन होणार आहे. कडूंनी त्याच्या मतदारसंघातील २०० खाटांचे रुग्णालय मंजूर करण्यात आले. परंतु सरकारकडून त्याला अद्याप निधी मिळाला नाही. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचेही भूमिपूजन झाले, पण त्यालाही निधी दिला नाही. अचलपूर जिल्हानिर्मित्तीचाही प्रश्न महत्त्वाचे आहे. वासनी प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाची अधिसूचना सरकारने काढावी. राजुरा येथील घरांना १५ लाखांचा निधी द्यावा, अशी मागणी कडू यांनी केली आहे. आंदोलन करताना कडू यांनी “सुनलो हमारी बात…” असा बोर्ड अंगावर लटकावत, एकदिवसीय आंदोलन करत आहे.

 

Related posts

सुषमाजींच्या वचनबद्धतेची तुलना कशाशीही होऊ शकत नाही !

News Desk

उन्नत शेती-समृद्ध शेतकरी” उपक्रमाचा घेतला कृषी अधीक्षक डॉ. मोटे यांनी आढावा

News Desk

चांगल्या निर्णयालाही शिवसेनेच्या मंत्र्यांचा खोडा – संभाजी पाटील-निलंगेकर यांचा आरोप

News Desk