HW News Marathi
Covid-19

कोरोना टेस्टींगमध्ये महाराष्ट्र नंबर १, राज्यात दररोज ७००० पेक्षा जास्त टेस्ट होतात !

मुंबई | कोरोना टेस्टींगमध्ये महाराष्ट्र नंबर १ वर असून महाराष्ट्रात दररोज सुमारे सात हजार कोरोना चाचण्या केल्या जातात. राज्यात काल ७११२ चाचण्या केल्या जात आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. टोपे पुढे म्हणाले, कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पूर्वी ३.१,त्यानंतर ५ आणि आता ७.१ दिवसांवर गेला आहे. हा जो ८ दिवसांचा कालावधी आहे तो अजून वाढविण्याचा उद्देश आहे. राजेश टोपेंनी काल (२२ एप्रिल) फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधतना राज्यातील कोरोनाच्या सध्या स्थितीवर माहिती दिली.

“मंबईत संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याचे काम आजपासून (२३ एप्रिल) सुरू करण्यात येणार आहे. कमी जागे मुळे होम क्वारंटाईन शास्त्रीय पद्धतीने होत नाही,अशा वेळी दाट वस्त्यांमधील नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल. त्यासाठी शाळांमध्ये खाटा टाकून तशी व्यवस्था केली जाईल,” असे स्पष्टपणे टोपेंनी सांगितले आहे.

“कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. चाचण्या केल्या जात आहेत, सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केले जात आहे. जर समजा कुठलीच उपाययोजना केली नाही तर काय होईल यासाठी गणितीय गृहितकावर आधारित रुग्णसंख्येची माहिती समाजमाध्यमांवर फिरत आहे. मात्र महाराष्ट्रात ज्या पद्धतीने कार्यवाही होत आहे. रुग्ण दुपटीचा दर सात दिवसांवर गेलाय त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. लोकांनी घाबरू नये,” असेही टोपेंनी सांगितले.

राज्यात फोटो बूथ सिस्टीमचा वापर

कोरोना उपचारासाठी नवीन तंत्रज्ञान आणले जात आहे. पीपीई किटची गरज भासू नये यासाठी फोटो बूथ सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी एक छोटी रुम केली जाईल ज्यात केवळ एक व्यक्ती (डॉक्टर) उभी राहू शकेल. त्या रूममधून केवळ हात बाहेर निघू शकेल ज्याला ग्लोव्हज असतील त्याद्वारे रुग्णाची स्वॅब चाचणी करता येईल, यासाठी पीपीई किटची गरज नाही. मुंबईत असे १०० फोटोबुथ बसविण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा

News Desk

महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत नियमांचे कठोर पालन करावे; डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

Aprna

राज्यात आज नवे  ४,९८१ रूग्ण आढळले

News Desk