HW News Marathi
महाराष्ट्र

विधान परिषदेच्या ५ जागांचा निकाल जाहिर

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणुक घेतली होती. २१ मे ला निवडणुक झाल्यानंतर २४ मे ला मतमोजणी देखील घेण्यात आली. सर्वच राजकीय पक्षांनी आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे पहायला मिळाले होते. विषेश म्हणजे सत्तेत असलेल्या भाजप शिवसेनेसाठी ही निवडणुक अत्यंत महत्वपूर्ण समजली जात होती.

गुरुवारी मतमोजणी झाल्यानंतर हाती आलेल्या निकालानुसार भाजप २ , शिवसेना २, राष्ट्रवादी १ अशा जागा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी विजयी झाल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का लागला आहे. उस्मानाबाद-लातूर-बीडची मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे ६ पैकी ५ जागांचे निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आले आहेत.

  • असा आहे विधान परिषदेच्या ५ जागांचा निकाल
  1. कोकण – राष्ट्रवादी काँग्रेस – अनिकेत तटकरे
  2. नाशिक – शिवसेना – नरेंद्र दराडे
  3. परभणी-हिंगोली – शिवसेना – विप्लव बजोरिया
  4. अमरावती – भाजप – प्रवीण पोटे
  5. चंद्रपूर – भाजप – रामदास आंबटकर
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का?, भाजपचा सवाल   

News Desk

मुंबईत शाळा सुरु, एका बेंचवर एक विद्यार्थी, पालकांची संमती आवश्यक!

News Desk

‘येस बँके’चे माजी सीईओ राणा कपूरच्या मुलीला विमानतळावर रोखले

swarit