HW News Marathi
Covid-19

नागपूरमध्ये आजपासून काय सुरु आणि काय बंद असणार? जाणून घ्या…

नागपूर | राज्यात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येताना दिसत आहे. अशात राज्य आता अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहे. आजपासून (७ जून) राज्यात ५ टप्प्यांत अनलॉक होणार आहे. पॉझिटीव्हीटी रेट आणि जिल्ह्यांत किती ऑक्सिजन बेड व्यापले आहेत यावर हा जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे. नागपूरमध्ये आजपासून काय सुरु आणि काय बंद राहणार जाणून घेऊयात…

नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आजपासून ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू राहतील. यापूर्वी २ वाजेपर्यंत दुकाने सुरु होती मात्र आता ती ५ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. ५ वाजल्यानंतर उपहारगृहे वगळता अन्य सर्व घटकांसाठी जमावबंदी (५ पेक्षा अधिक नागरिक एकत्र येण्यास बंदी )लागू राहील, अशी माहिती ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी काल (६ जून) पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान ही नियमावली शुक्रवारपर्यंत लागू असणार आहे. त्यानंतर कोरोनाचा जिल्ह्यातील आढावा घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

येत्या शुक्रवारपर्यंत जारी करण्यात आलेले निर्णय खालीलप्रमाणे

1. आवश्यक वस्तूंचे दुकान सुरु ठेवण्याची वेळ ५ वाजेपर्यंत राहील.

2. आवश्यक नसलेल्या वस्तूंच्या दुकानांची, आस्थापनांची वेळ पाच वाजेपर्यंत राहील.

3. शहरातील मॉल, चित्रपट गृहे ,मल्टिप्लेक्स नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेमध्ये फक्त पाच वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल.

4. उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेत रात्री दहा पर्यंत सुरू ठेवता येतील.

5. लोकल ट्रेन, मेट्रो नियमित सुरू राहतील.

6. सार्वजनिक ठिकाण, पटांगण, वॉकिंग, सायकलिंगसाठी सकाळी ५ ते ९ व सायंकाळी ५ ते ९ अशी परवानगी आहे.

7.खासगी कार्यालये सायंकाळी पाचपर्यंत सुरू ठेवता येतील. तर शासकीय कार्यालयात शंभर टक्के उपस्थितीत ५ वाजेपर्यत सुरु ठेवता येईल.

8. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हॉलच्या पन्नास टक्के उपस्थितीला परवानगी. मात्र ही क्षमता १०० व्यक्तीपर्यंत मर्यादित आहे.

9. लग्न समारंभ मंगल कार्यालयाच्या ५०% क्षमतेच्या उपस्थितीत करता येईल. मात्र ही पन्नास टक्के उपस्थिती कोणत्याही परिस्थितीत शंभर

लोकांपेक्षा अधिक असता कामा नये.

10.अंत्यसंस्कार अधिकाधिक 50 लोकांच्या उपस्थित राहता येईल.

11.बैठका, निवडणुका, स्थानिक प्रशासन व स्थायी समितीच्या बैठका ऑनलाईन पद्धतीने घेता येतील.

12.बांधकाम करण्यास परवानगी आहे.

13.कृषी, शेतीच्या सर्व कामांना सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी आहे.

14. ई-कॉमर्स साहित्य व सेवा पुरवठा नियमित असेल

15.जीम, सलून, सौंदर्य केंद्र, स्पा, वेलनेस केंद्र ५ वाजेपर्यंत सुरू राहतील.

16. सार्वजनिक वाहतूक मालवाहतुकीला परवानगी असेल. बसमध्ये उभे राहून प्रवासास निर्बध असेल.

17. आंतरजिल्हा प्रवास, खासगी कार, टॅक्सी, बस, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरू असतील. मात्र ज्या जिल्हयात ई -पास आवश्यक

असेल तिथे स्थानिक नियम पाळावे.

18. उत्पादन निर्यात करणाऱ्या कंपन्यांना माल निर्यात करता येईल. .

1. शाळा कॉलेजेस सर्व बंद असतील

20.सर्व धार्मिक स्थळे बंद असतील

21. सर्व जलतरण तलाव बंद असतील

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना रुग्णांच्या मृतदेहात व्हायरसचे किती वेळ राहतो ?, ICMR काय म्हणते ?

News Desk

संक्रमित रुग्णांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमाकांवर

News Desk

संभाजीराजे काय गौप्यस्फोट करणार ? मराठा आरक्षणावर भूमिका मांडण्याचे दिले संकेत

News Desk