HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष पदी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती

मुंबई | उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काल (२८ नोव्हेंबर) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर आज उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. आता महाविकासआघाडींच्या नव्या सरकारला उद्या (३० नोव्हेंबर) बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आता विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या नाव आघाडीवर आहे. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी आमदार कालिदास कोळंबकर यांनी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, कोळंबकर यांना हटवून त्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपच्या सत्तास्थापनेच्यादाव्यावर महाविकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मंगळवार (२६ नोव्हेंबर) विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते. या अधिवेशनासाठी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांनी नियुक्ती केली होती. यानुसार कोळंबकर यांनी नुकतेच नवनिर्वाचित २८८ आमदारांपैकी २८६ आमदारांना विधानसभेतील हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांनी शपथ दिली आहे.

दिलीप वळसे पाटील यांचा अल्पपरिचय

दिलीप दत्तात्रेय वळसे पाटील यांचा जन्म ३० ऑक्‍टोबर १९५६ आंबेगाव तालुक्‍यात झाला. १९९० मध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची पहिली निवडणूक लढवून विजयी झाले होते. यानंतर आंबेगाव येथून सलग ६ वेळा विजय मिळवून वीस वर्षे या आंबेगाव मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. आतापर्यंत दिलीप वळसे पाटील यांचा या मतदारसंघात एकदाही पराभव झाला नाही.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब ठाकरे असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव दिलं असतं- राज ठाकरे

News Desk

‘ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच’ विरोधी पक्षाची टीका

Ruchita Chowdhary

आमच्या विश्वासार्हतेला तडा गेला !

News Desk