HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

राऊत साहेबांना सोनू सूद सारखी प्रसिद्धी मिळवायची असेल तर एक उपाय !

मुंबई | “जर आपण कोरोना रुग्णांना दिलासा देण्याचे काम केलात, तर मी स्वत: सामना प्रेसवर येऊन तुमच्या पाया पडायला तयार आहे,” असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि नेते  संदीप देशपांडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर टीका केली. परप्रांतीयांना घरी जाण्यास मदत केल्याच्या कामगिरीवर अभिनेता सोनू सूदवर सामनातून टीका केली. यानंतर राज्याचे राजकारण तापले. यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील उडी घेतली आहे.

संदीप देशपांडेने व्हिडिओ त्यांच्या फेसबुक आणि ट्वीटवर  पोस्ट केला आहे, या व्हिडिओमध्ये देशपांडे म्हणाले, “राऊतसाहेब सध्या महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. एकतर आपल्या टेस्ट होत नाही. टेस्ट झाल्या तर रुग्णवाहिका मिळत नाही. रुग्णवाहिका मिळाली तर सरकारी रुग्णालयात जागा मिळत नाही. सरकारी रुग्णालयात जागा मिळाली नाही आणि जागा मिळाली तर सरकारी रुग्णालयांची परिस्थिती वाईट आहे. प्रायव्हेट वाले वाटेल ते बील आकारत आहे, अशी सध्या रुग्णांची अवस्था आहे. मला असे वाटते आपण ही रुग्णांची अवस्था सुधारली तर आपणही सोनू सूदसारखे प्रसिद्ध होऊ शकता. सर्वात महत्त्वाचे जर आपणही या रुग्णांना दिलासा देण्याचे काम जर केले, तर मी स्वत: सामना प्रेसवर येऊन तुमच्या पाया पडायला तयार आहे,”

रोखठोकमध्ये नेमके काय म्हणाले

“महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले,”

तसेच उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्ये बाहेरील लोकांना घ्यायला तयार नसताना सोनू सूद या सर्वांना नक्की कुठे पाठवत होता? लॉकडाऊन काळात इतक्या बसेसची नियमबाह्य व्यवस्था झालीच कशी? सोनू सूद जणू एक समांतर सरकार चालवत होता व त्याला हवे ते सर्व मिळत होते. सोनू सूद या महात्म्याचे नाव आता मोदींच्या ‘मन की बात’मध्ये येईल. मग ते दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीस जातील. एक दिवस ते भाजपचे स्टार प्रचारक म्हणून मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये फिरताना दिसतील. तसा करार आधीच झाला असेल म्हणूनच सोनू सूद लॉकडाऊनचा मालामाल हिरो म्हणून तळपत राहिला. इतर सर्व हिरो लॉकडाऊन काळात घरीच बसले तेव्हा सोनू सूदचा अभिनय बहरुन निघाला

 

 

Related posts

कंगणाला महाराष्ट्रात आणि मुंबईत राहण्यातच अधिकार नाही – गृहमंत्री

News Desk

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी सचिन अहिर

News Desk

एससी-एसटी आरक्षण मुदत वाढीसाठी आज एकदिवसीय विशेष अधिवेशन

News Desk