गडचिरोली | गडचिरोलीमधील भामरागड तालुक्यातील कोसफुंडीमध्ये नक्षलवाद्यांनी आज ( २२ जानेवारी) तीन जणांची निर्घृण हत्या केली आहे. हे तीनही जण पोलिसांचे खबरी असल्याचा संशयातून नक्षलवाद्यांनी यांची हत्या केल्यीची माहितीसमोर आली आहे. कोसफुंडी गावाजवळील रस्त्यावर या तिघांचे मृतदेह आढळून आले. कोसफुंडी फाट्याजवळील कसनासूर गावात काही नक्षलवादी गेले. त्यांनी ग्रामस्थांना शस्त्रांचा धाक दाखवून गावाबाहेर काढले.
Maharashtra: Naxals in Gadchiroli's Bhamragarh kill three people on suspicion of them being police informers pic.twitter.com/kmXeuhsYcg
— ANI (@ANI) January 22, 2019
याआधी एप्रिलमध्ये पोलिसांनी कसनसुर चकमकीत ४० नक्षलवाद्यांना मारल्याचा घटनेचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आली. जवळच नक्षलवाद्यांच्या दक्षिण गडचिरोली डिव्हिजन कमिटीच्या वतीने एक बॅनर लावण्यात आला आहे. तसेच पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून तीन ग्रामस्थांची निर्घृणपणे हत्या केली. मालू दोगे मडावी, कन्ना रैनू मडावी आणि लालसू मासा कुडयेटी अशी हत्या झालेल्या ग्रामस्थांची नावे आहेत. छत्तीसगडमधून आलेल्या १०० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी गावात येऊन या तिघांना सोबत नेऊन त्यांची हत्या केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.