HW News Marathi
महाराष्ट्र

‘शिवराज्याभिषेक सोहळा’ असा महाराष्ट्राचा चित्ररथ

 

देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. नवी दिल्लीत राजपथवर वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथांचं संचलन सुरू आहे. यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथात शिवराज्याभिषेक सोहळ्याचं दर्शन घडलं. ‘तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है । या कविराज भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या काव्याचा उद्घोष करत शिवरायांची किर्ती सांगणारा चित्ररथ राजपथावर उतरला होता.

महाराष्ट्राच्या चित्ररथातील कवी भूषण यांचं हे काव्य अजय-अतुलने संगीतबद्ध केलेलं आहे. ज्या राजधानी दिल्लीने छत्रपतींच्या स्वराज्याला कायम कमी लेखलं, ज्या दिल्लीश्वरांशी झगडण्यात शिवरायांचं आयुष्य खर्ची पडलं त्याच दिल्लीच्या मातीत अनेक राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या पराक्रमाची कीर्ती सांगणारा हा चित्ररथ दिमाखात अवतरला.

महाराष्ट्राच्या वतीने साकारण्यात आलेल्या चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती. त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आली तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती असून, त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवले. या ठिकाणी आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजन दाखवले. दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे दाखवण्यात आले आहेत. चित्ररथाच्या मागील भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या आहेत. या चित्ररथाची संकल्पना ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली आहे.

दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे दाखवण्यात आले आहेत. चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या आहेत. या चित्ररथाची संकल्पना ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली; ‘या’ तारखेला मुंबईत होणार अधिवेशन

News Desk

राधेश्याम मोपलवार यांना पदावरून हटवले

News Desk

एसटी संप मिटवण्यापेक्षा तो चिघळला पाहिजे, राज्य सरकारची भूमिका; पडळकरांचा गंभीर आरोप

Aprna