HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र सैनिक संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्री, जिल्हाधिकारी व उपनिबंधकाना निवेदन

मनसेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र सैनिक संदीपदादा मोझर यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्री, जिल्हाधिकारी व उपनिबंधकाना निवेदन

सातारा | वर्षा माडगूळकर,शिरीष कुलकर्णीसह त्यांच्या बागलबच्यांना अटक करा व त्यांच्या मालमत्तेची विक्री करून ठेवीदारांची देणी द्या,अशी मागणी करीत जिजामाता महिला बँकेच्या ठेवीदारांनी आज साताऱ्यात मोर्चा काढून सहकार मंत्री,जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांना मागण्या पूर्ण करण्याचे गाऱ्हाणे घालत निवेदने दिली. तसेच माननीय मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा यशस्वी करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

जाणीवपूर्वक अनियमित कामकाज व पैश्यांचा अफरातफरीमुळे येथील जिजामाता महिला सहकारी बँकेवर रिजर्व्ह बँकेने निर्बंध आणल्याने ही बँक बंद पडली आहे.

‘स्थानिक बँक आहे’व ‘ज्यादा व्याजदर मिळतो’ या आमिषाने हजारो ठेवीदारांनी या बँकेत ठेवलेल्या ठेवी अडकून पडल्याने अडचणीत आलेल्या व हवालदील झालेल्या ठेवीदारांनी महाराष्ट्र सैनिक संदीपदादा मोझर यांच्या नेतृत्वाखाली आज साताऱ्यात जाहीर मोर्चा काढून संतप्त ठेवीदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी ६ टीएमसी पाणी देण्याचे आदेश ‘-जलसंपदामंत्री जयंत पाटील

News Desk

#Coronavirus : नंदुरबारमध्ये कोरोनाचा आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड ?

News Desk