HW News Marathi
महाराष्ट्र

“लतादीदीच्या गाण्यातून राष्ट्रभक्ती”, पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधानांकडून आठवणींना उजाळा

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने सुरू असलेल्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार मिळणारे पहिले मानकरी ठरले आहेत. पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधानांनी म्हणाले, “लता दीदीसोबतचे नाते खूप जुने असून सुधीर फडकेंमुळे माझी लतादीदीशी ओळख झाली. संगीताची शक्ती म्हणजे लतादीदीमधून दिसली. पुरस्कार सर्व देशवासियांना समर्पित करतो,” असे ते म्हणाले. पंतप्रधान हे गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ स्वीकारण्यासाठी मुंबईत आले आहेत. हा पुरस्कार सोहळा आज (२४ एप्रिल) षण्मुखानंद सभागृहात सुरू आहे.

पंतप्रधान म्हणाले, “पहिल्यांदा रक्षाबंधनाला लतादीदी नसणार आहे. संगीत साधनाही आणि भावना ही आहे. लता दीदीसोबतचे नाते खूप जुने असून सुधीर फडकेंमुळे माझी लतादीदीशी ओळख झाली. संगीताची शक्ती लतादीदीमधून दिसली. तर मला मिळालेला हा पुरस्कार सर्व देशवासियांना समर्पित करतो. सरस्वतींचे प्रतिरुप म्हणजे लतादीदी आहेत. लतादीदीचे सूर युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. मंगेशकर कुटुंबाचे देशासाठी मोठे योगदान असून लतादीदीच्या गाण्यात राष्ट्रभक्ती दिसून येत होती.” 

या पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गायिका उषा मंगेशकर, गायिका आशा भोसले, आदिनाथ मंगेशकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजपा नेते विनोद तावडे आदींची उपस्थिती होती.

Related posts

जनाशीर्वाद यात्रा म्हणजे तिसऱ्या लाटेला आमंत्रण!

News Desk

‘त्या’ ८० हजार फेक अकाऊंटचे मालक कोण? फेसबुक आणि ट्वीटरने जाहीर करावे !

News Desk

मुख्यमंत्री म्हणून टिकून राहण्यासाठी उद्धव ठाकरेंसमोर कोणते पर्याय आहेत ?

News Desk