नंदुरबार | मकर संक्रांतीनिमित्त नर्मदा नदीच्या पात्रात स्नान आणि फिरण्यासाठी गेलेल्या भाविकांची एक बोट उलटून आहे.ही बोट बुडाल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. नंदुरबारमधील धडगाव तालुक्यातील भुश्या पॉईंट जवळ ही घटना घडली. या अपघातात ३५ भाविकांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Maharashtra: Six people died after a boat capsized in Narmada river in Nandurbar district today. More details awaited. pic.twitter.com/wfv5PzVFVf
— ANI (@ANI) January 15, 2019
या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या बोटीतील सर्व प्रवासी महाराष्ट्रातील असून घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थांनी बुडणाऱ्या भाविकांना तातडीने बाहेर काढण्सा मदत केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहे. या अपघातात जखमी झालेल्या ३५ जणांना धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.