HW News Marathi
महाराष्ट्र

गोविंद पानसरे हत्याप्रकरणी एसआयटीकडून आणखी ३ जणांना अटक

कोल्हापूर | ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आणखी तीन मारेकऱ्यांना आज (६ सप्टेंबर) पहाटे मुंबई आणि पुणे येथून अटक करण्यात आली आहे. यात डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सचिन अंदुरे या शार्प शूटरचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी अंदुरेला पुण्याच्या तुरुंगातून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन या दोघांना मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून ताब्ता घेतले आहे. या तिव्ही मारेकऱ्यांना आज कोल्हापूर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

या तिन्ही मारेकऱ्यांना ताब्यात घेतल्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या बारा झाली आहे. कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी एसआयटीने यापूर्वी शरद कळसकर याला अटक केली आहे. पानसरे यांची २०१५ मध्ये कोल्हापूरात गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार अद्याप सापडलेला नाही. त्याबाबत पानसरे कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाकडून तपास करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझी पत्नी आरएसएसमध्ये कधी गेली ?

News Desk

दिवाळीनंतर मंदिरे सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत…

News Desk

लोकशाही तेव्हाही जिंकली, आजही जिंकली, लोकशाही जिवंत आहे !

News Desk