HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा २०१९

आता शिवसेनाप्रवेशाच्या चर्चांना भुजबळ स्वतःच देणार पूर्णविराम ?

मुंबई | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पुन्हा आपल्या स्वगृही म्हणजे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या उलटसुलट चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या. मात्र, आता अखेर स्वतः छगन भुजबळ हेच या चर्चांना पूर्णविराम देणार असल्याचे बोलले जात आहे. आज (६ सप्टेंबर) पुण्यात होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे भुजबळ यांचा शिवसेना प्रवेश होणार नसल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील गुरुवारीच (५ सप्टेंबर) या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

“काल छगन भुजबळ यांनी स्वतः असे वक्तव्य आहे कि ‘मी आहे तिथे बरा आहे’. त्यामुळे चित्र स्पष्ट झालेच आहे. सगळ्यांनाच आमच्या पक्षात घ्यायला आमच्याकडे काही वॉशिंग मशीन नाही. आम्ही पारखून घेऊनच नेत्यांना पक्षात घेत असतो”, असे म्हणत संजय राऊत यांनी भुजबळ यांच्या पक्षप्रवेशावर भाष्य केले. दरम्यान, विधानसभेच्या दृष्टीने पुण्यात राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित असतील. छगन भुजबळ देखील या बैठकीला उपस्थित राहतील.

छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर नाशिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी २४ ऑगस्ट रोजी मुंबईत मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी, “छगन भुजबळ हे येवला आणि नांदगावमधील जागा वाचवू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ते शिवसेनेत येत असून त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये”, अशी मागणी शिवसैनिकांनी केली होती. त्यावेळी, छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नसल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे वृत्त होते. तर दुसरीकडे छगन भुजबळांनी शिवसेनेत यावे अशी स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे दिसत होते.

Related posts

कोरोनाचा ग्रामीण भागात वेगाने फैलाव! मोदींचा सतर्कतेचा इशारा

News Desk

“सरकार वाझेंना का पाठिशी घालतंय?”, फडणवीसांचा सवाल  

News Desk

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जास्त काय सुरू ठेवण्यासाठी आरोग्य विभागाचे ‘हे’ पर्याय!

News Desk