HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर एनडीएमध्ये सहभागी

मुंबई महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार आहे अशी घोषणा आज पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी केली आहे. राणे कॉग्रेस सोडल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा केल्यापासून त्यांचा पक्ष एनडीएमध्ये दाखल होईल, अशी चर्चा होती. अखेर आज राणेंनी आपला पक्ष एनडीएमध्ये सहभागी होत असल्याची घोषणा केली.

आपल्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच अंतिम निर्णय घेईल, असे राणे यांनी सांगितले. आमदार नितेश राणेसह अनेक आमदार आपल्या पक्षात येतील असा दावा राणे यांनी केला.त्याबरोबरच ग्रामपंचायत निवडणुकींत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे 27 सरपंच बिनविरोध निवडून आल्याचा त्यांनी उल्लेख केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर

News Desk

लाठ्या-काठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक, दोन गटात हाणामारी

News Desk

“वापरा आणि फेका ही निती भाजप सर्वत्र वापरतात”, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Aprna