मुंबई | मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास सध्या ATS करत असून या तपास त्यांनी NIA कडे द्या असे निर्देश ठाणे सत्र न्यायालयाने ATS ला दिले आहेत. या निर्देशामुळे महाराष्ट्र ATS ला मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी होती. त्या गाडीचे मुळ मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला, त्यांचा मृतदेह मुंब्राच्या खाडीत सापडला. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. दरम्यान, या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आले. आत्तापर्यंतच्या तपासाअंती सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, काल (२३ मार्च) ATS प्रमुख जयजित सिंग यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. मनसुख हिरेन यांची हत्या नेमकी कशी झाली? याप्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा काय संबंध होता? त्यांनी हे कृत्य घडवून आणण्यासाठी कुणाकुणाला कामाला लावलं? याप्रकरणाचे धागेदोरे गुजरातपर्यंत कसे गेले? आदी सर्व माहिती जयजित सिंग यांनी दिली आहे. त्यामुळे हिरेन यांची हत्या हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचं स्पष्ट होत आहे.
Maharashtra: Thane sessions court has asked ATS to stop investigation of Mansukh Hiren death case & hand over the case to NIA.
NIA has approached the court after ATS was not handing over the case to NIA despite MHA's orders in this regard..
— ANI (@ANI) March 24, 2021
सचिन वाझे सध्या एनआयएच्या ताब्यात आहेत. आम्हाला त्यांची कसून चौकशी करायची आहे. आम्ही त्यासाठी ट्रान्स्फर वॉरंट मिळवलं आहे. २५ तारखेला एनआयए कोर्टात सुनावणी होणार असून त्यावेळी वाझेला आमच्या ताब्यात देण्याची विनंती याचिकेद्वारे करण्यात येणार आहे, असं सांगतानाच आम्ही हा कट उघडकीस आणणार असून गुन्ह्यातील मूळ सूत्रधारांना लवकरच अटक करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, त्या आधाची ठाणे सत्र न्यायालयाने ATSला मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास थांबवत तो NIAकडे द्यावा असं सांगितलं आहे. त्यामुळे आता पुढे या प्रकरणात काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
ATSनं नुकतीच दोन आरोपींना अटक केली होती
या प्रकरणातील महत्त्वाची कडी ठरलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएनं याआधीच अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणात अटक केली आहे. आता मनसुख हिरेन प्रकरण देखील एनआयएकडे आल्यामुळे या दोन्ही प्रकरणांवर सचिन वाझेंची चौकशी करण्याचा मार्ग एनआयएसाठी मोकळा झाला आहे. मंगळवारी एटीएसनं पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेंनीच विनायक शिंदे या पॅरोलवरील आरोपीचा वापर करून गुन्ह्यामध्ये सहभाग ठेवल्याचं स्पष्ट केलं होतं. वाझेंच्या सांगण्यावरूनच विनायक शिंदेने गुन्ह्यात वापरलेली सिमकार्ड खरेदी करून ती इतरांना दिली होती. त्यानुसार या प्रकरणात अजून काहींनी अटक होण्याची शक्यता आहे, असं देखील एटीएसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.